शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

देशी शस्त्रास्त्रांची सक्ती करणे शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:51 IST

युद्धसज्जतेसाठी कोणत्या प्रकारची शस्त्रास्त्रे आणि युद्धसामुग्री कोणाकडून घ्यायची हा पूर्णपणे सैन्यदलांच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे सैन्यदलांनी फक्त देशी बनावटीचीच शस्त्रास्त्रे वापरावीत अशी सक्ती त्यांच्यावर केली जाऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी घेतली.

नवी दिल्ली : युद्धसज्जतेसाठी कोणत्या प्रकारची शस्त्रास्त्रे आणि युद्धसामुग्री कोणाकडून घ्यायची हा पूर्णपणे सैन्यदलांच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे सैन्यदलांनी फक्त देशी बनावटीचीच शस्त्रास्त्रे वापरावीत अशी सक्ती त्यांच्यावर केली जाऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी घेतली.जगभरातील शस्त्र व युद्धसामुग्री उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर भारतात कारखाने सुरू करावे, यासाठी भरविलेल्या ‘डिफेन्स एक्स्पो’चे दक्षिण किनाऱ्यावरील थिरुविदंताई येथे उद््घाटन झाले. त्यानंतर, पत्रकारांनी भारत जगातील पहिल्या २५ शस्त्र उत्पादकांमध्येही नाही व भारतीय सैन्यदलेही देशी बनावटीची शस्त्रे घेत नाहीत, याविषयी विचारले असता सीतारामन यांनी ही भूमिका मांडली.सीतारामन म्हणाल्या की, गरजेनुसार शस्त्रे व युद्धसामुग्री निवडण्याचा लष्कर, हवाई दल व नौदलास अधिकार आहे. यात सरकार कितपत हस्तक्षेप करू शकते, याची सीमारेषा अगदी धूसर आहे. सैन्यदलांच्या अधिकारांत हस्तक्षेप करून, तुम्ही फक्त देशी बनावटीचीच शस्त्रे घ्या, अशी सक्ती सरकार करू शकत नाही. फार तर जास्तीतजास्त देशी खरेदी करा व या उद्योगात देशी उद्योजकांनाही शिरकाव करण्यास वाव द्या, एवढेच सरकार सांगू शकते.असलेली बहुतांश शस्त्रे कशी कालबाह्य व जुनी झाली आहेत व नवी खरेदी करण्यासाठी निधी कसा अपुरा आहे, याची कैफियत तिन्ही सैन्यदलांनी अलीकडेच संसदीय समितीपुढे मांडली होती. पश्चिम व उत्तर अशा दोन्ही आघाड्यांवर एकदम युद्ध लढण्याची वेळ आली, तर यामुळे युद्धसज्जतेस बाधा येईल, असेही सैन्यदलांनी समितीस सांगितले होते.>५२० कंपन्यांचा सहभागपंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी प्रदर्शनात मार्गदर्शन करतील. संरक्षण उत्पादनातील ‘मेक इन इंडिया’ वर ते कंपन्यांशी संवाद साधतील. स्वदेशी कंपन्या, तसेच साब, बोइंग, लॉकहिट मार्टीन, एअरबस, बीएइ या परदेशातील मातब्बर कंपन्यांसह ५२० कंपन्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन