शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीची हत्या होताना मूक साक्षीदार बनू शकत नाही...

By admin | Updated: February 5, 2016 03:12 IST

लोकशाहीची हत्या होत असताना सर्वोच्च न्यायालय मूक प्रेक्षक बनू शकत नाही, या शब्दांत घटनापीठाने गुरुवारी भाजपच्या आमदाराला खडसावले आहे. हे न्यायालय राज्यपालांच्या अधिकारांच्या मुद्यावर विचार करीत आहे

नवी दिल्ली : लोकशाहीची हत्या होत असताना सर्वोच्च न्यायालय मूक प्रेक्षक बनू शकत नाही, या शब्दांत घटनापीठाने गुरुवारी भाजपच्या आमदाराला खडसावले आहे. हे न्यायालय राज्यपालांच्या अधिकारांच्या मुद्यावर विचार करीत आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय न्यायालयीन समीक्षेच्या अखत्यारीत येऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद भाजपचे आमदार टी. ताकी यांनी केला होता.लोकशाहीची हत्या होत असेल, तर न्यायालय शांत कसे बसणार? असा सवाल त्यावर न्या. जे.एस. खेहार यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय घटनापीठाने केला. दीपक मिश्रा, एम.बी. लोकूर, पी.सी. घोसे आणि एन.व्ही. रामण हे न्यायाधीश घटनापीठाचे अन्य सदस्यआहेत. राष्ट्रपती राजवटीमुळे घटनात्मक पेच निर्माण झालेल्या अरुणाचल प्रदेशातील भाजपच्या आमदाराने राज्यपालांच्या निर्णयावर विचार करण्यास आक्षेप घेतला. दरम्यान, न्यायालयाने आॅक्टोबरपासून ८ फेब्रुवारीपर्यंतचा अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या पत्रव्यवहाराचा सर्व तपशील मागितला आहे. विधानसभेच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या दस्तऐवजांवर घटनापीठाने नाराजी व्यक्त केली.आजही चालणार सुनावणीविधानसभेचे अध्यक्ष रेबिया आणि अन्य काँग्रेस आमदारांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले असून, अशा याचिकांवर घटनापीठ शुक्रवारीही सुनावणी करणार आहे. भाजपचे आमदार टी. ताकी यांनी राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यात काँग्रेसने विलंब का लावला, असा प्रश्न उपस्थित करीत हरकत घेतली होती.बंडखोर आमदारांचेकाँग्रेससमोर आव्हानगेल्या वर्षभरापासून अरुणाचलचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांना काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी जेरीस आणले आहे. अखेर निम्म्या आमदारांनी विरोधी भाजपशी हातमिळवणी करीत तुकी यांचे सरकार उलथवण्याचा चंग बांधला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका हॉटेलमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन घेत तुकी सरकारच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब केले होते. विधिमंडळाला मुख्यमंत्र्यांच्या गटाने टाळे लावल्यानंतर वेळेवर अधिवेशन बोलाविण्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार राज्यपालांनी आमदारांना हॉटेलमध्ये बैठक घ्यायला मोकळीक दिली, असा युक्तिवाद केंद्राने केला होता. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सहभाग असल्याखेरीज विधानसभेचे अधिवेशन बोलावले जाऊ शकत नाही, असे काँग्रेसने याचिकेत म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)विधानसभेचे अध्यक्ष नबाम रेबिया आणि राज्यपाल जे.पी. राजखोवा यांनी विधानसभेचे अधिवेशन नियोजित वेळेआधी बोलाविण्याबाबत कोणता पत्रव्यवहार केला. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत कशा प्रकारे संपर्क साधला गेला, याची माहिती घटनापीठाला हवी आहे.विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्याचा राज्यपालांचा निर्णय लोकशाहीविरोधी ठरविता येत नाही. कारण त्यातून लोकशाही प्रक्रिया निष्फळ ठरविल्याचे निष्पन्न होत नाही. याउलट विधानसभा इमारतीला टाळे लावणे हे लोकशाहीविरोधी कृत्य ठरते, असा युक्तिवाद बंडखोर आमदारांचे वकील राकेश द्विवेदी यांनी केला. काही घटनात्मक योजनांनुसार राज्यपालांना विशेष अपवादात्मक परिस्थितीत स्वत:हून निर्णय घेता येतात.