शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस संघाविरुद्ध उघडणार मोहीम

By admin | Updated: September 6, 2016 03:57 IST

महात्मा गांधीजींच्या हत्येसंदर्भातील विधानावरून भिवंडी कोर्टातील दाव्याप्रकरणी काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध जोरदार मोहीम चालविण्याची तयारी करीत आहे.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- महात्मा गांधीजींच्या हत्येसंदर्भातील विधानावरून भिवंडी कोर्टातील दाव्याप्रकरणी काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध जोरदार मोहीम चालविण्याची तयारी करीत आहे. जेणेकरून संघाचा खरा चेहरा उघडा करता येईल. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कपिल सिब्बल यांची भेट घेऊन दीर्घ चर्चा केल्यानंतर कठोर भूमिका घेत आपले वकील कपिल सिब्बल यांना सांगितले की, नथुराम गोडसे संघ आणि हिंदू महासभा यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा होता, हे ऐतिहासिक तथ्य खरे नाही, हे सरसंघचालकांना कोर्टात येऊन सिद्ध करावे, यासाठी जोरदार आग्रह धरण्यात येईल. कपिल सिब्बल यांनी याच आधारावर हा मुद्दा कोर्टात मांडण्याची तयारी सुरू केली आहे. राहुल यांच्या विशेष चमूने ऐतिहासिक तथ्य शोधून याची माहिती राहुल यांना दिली. त्यानंतर काँग्रेस या प्रकरणात संघाविरुद्ध जोरदार मोहीम उघडणार असल्याचे संकेत मिळाले. दुसरीकडे, राहुल यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रदेश शाखांनाही संघाविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. जेणेकरून संघाविरुद्ध लोकांना जागृत करून संघाचा असली चेहरा जनतेसमोर उघडा पाडता येईल. हा अब्रुनुकसानीचा दावा राजकीय मार्गाने लढण्याची काँग्रेसची इच्छा आहे. जेणेकरून उत्तर प्रदेश आणि पंजाबात होणाऱ्या निवडणुकीत फायदा होईल.सत्य काय आहे, हे सिद्ध करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांची उलटतपासणी करण्याची परवानगी मिळावी,अशी मागणी कपिल सिब्बल पुढच्या सुनावणीच्या वेळी कोर्टाकडे करतील, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. गांधीजींच्या हत्येतील संघाची भूमिका न्यायालयात आणि जनतेत उघड करण्यासाठी राजेश कुंटे यांनाही उलटतपासणीसाठी बोलावण्याची सिब्बल मागणी करतील.आपण कोर्टात उपरोक्त मागणी करणार आहोत. प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांनुसार गांधीजींच्या हत्येत संघाची भूमिका होती; परंतु संघ आणि कोणाकडूनही आजवर सवाल उपस्थित का करण्यात आला नाही, असा सवाल करून, या पुस्तकातील उतारे पुरावे म्हणून कोर्टात सादर करणार असल्याचे अ‍ॅड. सिब्बल यांंनी सांगितले.>‘तो’ पत्रव्यवहारही सादर करणार सिब्बल हे जवळपास बारा पुस्तकांतील या मुद्द्याांशी संबंधित उतारे कोर्टात सादर करण्याच्या तयारीत आहेत, तसेच गांधीजींच्या हत्येनंतर नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात संघाबाबत झालेला पत्रव्यवहारही सादर करणार आहेत, असे सिब्बल यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले. गांधी हत्येनंतर संघाने मिठाई वाटली, असा उल्लेख असलेले पत्र सरदार पटेल यांनी तत्कालीन सरसंघचालक गोळवळकर यांना लिहिले होते, त्याबाबतही कोर्टाला माहिती दिली जाईल.