जम्मू: जम्मूत परिस्थिती अद्याप तणावपूर्णच असून शनिवारी अनेक भागात लष्कर तैनात करण्यात आले होते. लष्करी बंदोबस्तातच पोलिसांसोबत संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी आणि जिल्हा पोलीस प्रमुखाच्या बदलीसह आंदोलनकर्त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत.लष्करातर्फे सकाळी जम्मू शहरातील मिरानसाहिब, सतवारी, डिगियाना, आर. एस. पुरा, तालाब टिल्लू, बक्षीनगर आणि रिहाडीसह इतर तणावग्रस्त भागात संचलन करण्यात आले. खलिस्तानी दहशतवादी नेता भिंद्रानवालेच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त येथे कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. काही भागात भिंद्रानवालेचे पोस्टर्स हटविल्यावरून शीख समुदायातर्फे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शहर प्रशासनाच्या विनंतीवरून लष्कराच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्याचे संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी पोलिसांसोबत संघर्षात ठार झालेल्या युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाने गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (वृत्तसंस्था)याशिवाय जम्मूच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांची बदली, सतवारीचे ठाणेदार कुलबीरसिंग यांचे निलंबन आणि गोळीबारात ठार झालेला शीख तरुण जगजितसिंग याच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत आदी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. गोळीबारप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या पीएसओविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)आॅपरेशन ब्ल्यू स्टार स्मृतिदिन; तलवारी निघाल्या, ५ जखमीअमृतसर: आॅपरेशन ब्ल्यू स्टारच्या ३१ व्या स्मृतिदिनी शनिवारी सुवर्ण मंदिरात जमलेल्या लोकांमध्ये चकमक उडाल्याने पाच जण जखमी झाले. एसजीपीसी कृती दलाच्या सदस्यांनी अकाल तख्तजवळ मंदिर परिसरात खलिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी करीत असलेल्या २२ शीख युवकांवर लाठीमार केला. या लाठीमारात पाच आंदोलनकर्ते युवक जखमी झाले. त्यापैकी दोघांच्या डोक्याला मार लागला. पोलिसांनी २२ युवकांना ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीस आयुक्त परमपाल सिंग यांनी दिली. - शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे (एसजीपीसी) अध्यक्ष अवतारसिंग मक्कड यांच्या सांगण्यानुसार काही असामाजिक तत्त्वांचे हे कृत्य होते. त्यांनीच फुटीरवादी घोषणाबाजी करून हवेत तलवारी फिरवल्या. - या घटनेमुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. सुवर्ण मंदिरात अशांतता निर्माण करणाऱ्यांमध्ये अनेक बिनादाढीचे होते आणि परिसर अपवित्र करण्यासाठीच ते आले होते, अशी खंत एसजीपीसीने व्यक्त केली.-तत्पूर्वी सकाळी माजी खासदार ध्यानसिंग मांड यांच्या नेतृत्वात शिरोमणी अकाली दल (अमृतसर) समर्थकांनी अकाल तख्तजवळ तलवारी काढून खलिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्या.-यावेळी मृत दहशतवादी नेता जर्नेलसिंग भिंद्रानवालेच्या कुटुंबातील सदस्यांचा अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी गुरबचनसिंग यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कट्टरपंथी खालसाने यानिमित्त बंदचे आवाहन केले होते. अप्रिय घटना टाळण्यासाठी पंजाब पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त केला होता.
जम्मूत लष्करास पाचारण
By admin | Updated: June 7, 2015 14:34 IST