शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

चीनची पुन्हा युद्धाची भाषा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:15 IST

भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती असताना चीनकडून सातत्याने युद्धाची भाषा बोलली जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही चीनच्या सैन्यात सर्व शत्रूंना मात देण्याची क्षमता असल्याचे म्हटले

बीजिंग : भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती असताना चीनकडून सातत्याने युद्धाची भाषा बोलली जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही चीनच्या सैन्यात सर्व शत्रूंना मात देण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. एका अर्थाने भारताला ही चेतावनी असल्याचे मानले जात आहे.पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ९० व्या स्थापना दिवसानिमित्त मंगोलियात झालेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या लष्करी संचलनानंतर ते बोलत होते. सैन्याच्या ड्रेस परिधान केलेल्या शी जिनपिंग यांनी खुल्या जीपमधून आशियातील सर्वात मोठे सैन्य प्रशिक्षण केंद्र झुरिहे येथे १२ हजार सैन्याच्या परेडचे निरीक्षण केले. चीनच्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १०० पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी यावेळी उड्डाण केले. यावेळी ६०० प्रकारच्या हत्यारांचे प्रदर्शन करण्यात आले. सैनिकांना संबोधित करताना शी जिनपिंग म्हणाले की, मला विश्वास आहे की, आमच्या सैन्यात सर्व शत्रूंना मात देण्याची क्षमता आणि साहस आहे. तथापि, डोकलामवरून भारत आणि चीन यांच्यात सुरूअसलेल्या तणावाचा त्यांच्या भाषणात कुठे उल्लेख आला नाही.चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे प्रशिक्षण पूर्वनियोजित होते. आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात शी जिनपिंग म्हणाले की, आमचे सैन्य एका मजबूत सैन्याच्या निर्मितीत नवा अध्याय लिहिण्यासाठी तयार आहे. विश्व शांती आणि सुरक्षा यात योगदान देण्यासाठी सैन्य तयार आहे. या कार्यक्रमाचे सरकारी टीव्ही आणि रेडिओवर प्रसारण करण्यात आले. भारतीय सीमेजवळ चीनने अलीकडेच ज्या रणगाड्यांचा सराव केला होता त्या रणगाड्यांचा आज संचलनात सहभाग करण्यात आला होता. अमेरिकी सैन्यानंतर चीनच्या सैन्याचा जगात दुसरा क्रमांक आहे. त्यांचे संरक्षण बजेट १५२ अमेरिकी डॉलर आहे. पीएलएची स्थापना १९२७ मध्ये झालेली आहे. (वृत्तसंस्था)१२००० जवान, १२९ विमाने -या संचलनात १२ हजार जवानांनी सहभाग घेतला होता. १२९ विमाने आणि ५७१ उपकरणांचा यात समावेश होता. डोंगफेंग मिसाईल (यात छोटे, मोठे आणि मध्यम क्षमतेचे रॉकेट आहेत) आणि रणगाडे व ड्रोन यांच्यासह विविध हत्यारांचे यावेळी प्रदर्शन करण्यात आले.युद्धाच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे गतीने उतरणे आदी कसरती यावेळी सादर करण्यात आल्या. डोकलाम भागात भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू असताना हे संचलन आयोजित करण्यात आलेले आहे हे विशेष.