शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ जोड/ बीओटीमधून कंपन्यांना बाहेर पडता येणार

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

बीओटी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांनी कंपन्यांना आपल्या वाट्याची गुंतवणूक करून या प्रकल्पातून बाहेर पडण्याची मुभा दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने या आशयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ३० सप्टेंबर २००९ पर्यंत जारी करण्यात आलेल्या बीओटी प्रकल्पांमध्ये १०० टक्के गुंतवणूक करण्याची परवानगी देण्याचा निर्णय १३ मे २०१५ रोजी सरकारने घेतला होता. राष्ट्रीय महामार्ग बिल्डर्स फेडरेशनने निगडित सर्व कंपन्यांना हा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा चालविला होता. त्यानुसार सरकारने नव्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे प्रलंबित महामार्ग प्रकल्प पूर्ण करण्यास मदत मिळेल. १०० टक्के गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आपले भागभांडवल विकून बाहेर पडता आल्याने अन्य प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचा पर्याय खुला रा

बीओटी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांनी कंपन्यांना आपल्या वाट्याची गुंतवणूक करून या प्रकल्पातून बाहेर पडण्याची मुभा दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने या आशयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ३० सप्टेंबर २००९ पर्यंत जारी करण्यात आलेल्या बीओटी प्रकल्पांमध्ये १०० टक्के गुंतवणूक करण्याची परवानगी देण्याचा निर्णय १३ मे २०१५ रोजी सरकारने घेतला होता. राष्ट्रीय महामार्ग बिल्डर्स फेडरेशनने निगडित सर्व कंपन्यांना हा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा चालविला होता. त्यानुसार सरकारने नव्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे प्रलंबित महामार्ग प्रकल्प पूर्ण करण्यास मदत मिळेल. १०० टक्के गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आपले भागभांडवल विकून बाहेर पडता आल्याने अन्य प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचा पर्याय खुला राहील, असे सरकारला वाटते.
------------------------------------
रॉयल्टीच्या फरकाची रक्कम
सरकारने कच्च्या तेलाच्या उत्पादनासाठी राज्यांना दिल्या जाणाऱ्या रॉयल्टीच्या फरकाची रक्कम
(डिफरेन्शियल रॉयल्टी) अर्थसंकल्पीय तरतुदीतून देण्याला मंजुरी दिली आहे. २०१५-१६ पासून ही फरकाची रक्कम तेल उद्योग विकास मंडळाकडून (ओआयडीबी)दिली जाणार असून त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने घेतला. निर्धारित रॉयल्टीचा दर आणि सरकारकडून अधिसूचित रॉयल्टीचा दर यातील फरकाला डिफरेंशियल रॉयल्टी संबोधले जाते.