शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जयललितांचे छायाचित्र ठेवून मंत्रिमंडळ बैठक

By admin | Updated: October 20, 2016 04:47 IST

जयललिता यांच्या खात्यांचे राज्यपालांनी वाटप केल्यानंतर अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी बुधवारी पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली.

चेन्नई : आजारी मुख्यमंत्री जयललिता यांच्या खात्यांचे राज्यपालांनी वाटप केल्यानंतर अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी बुधवारी पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. जयललितांच्या अनुपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने या बैठकीची छायाचित्रे प्रसिद्धीला दिली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जयललिता यांचे छायाचित्र ठेवल्याचे आणि पनीरसेल्वम शेजारच्या खुर्चीवर विराजमान असल्याचे दिसते.सरकारने बैठकीची कार्यक्रमपत्रिकेचे विवरण दिले नाही. तथापि, मंत्रिमंडळाने कावेरी जल वाटपासह इतर मुद्द्यांवर चर्चा केल्याचे समजते. ईशान्य मान्सून सुरू होण्यापूर्वी ही बैठक झाली. ईशान्य मान्सून या महिनाअखेरीस सुरू होणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ईशान्य मान्सूनने तामिळनाडूत प्रचंड विध्वंस घडवून आणला होता. चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री जयललिता मंत्रालयात परतेपर्यंत गृहमंत्रालयासह त्यांच्याकडील विभाग पनीरसेल्वम यांच्याकडे सोपविले होते. जयललिता गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात आहेत. ताप व निर्जलीकरणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.