शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

HPCLमधील सरकारी भागीदारी ONGCला विकण्यास कॅबिनेटची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 21:22 IST

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन(एचपीसीएल)मधील सरकारची भागीदारी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन(ओएनजीसी)ला विकण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन(एचपीसीएल)मधील सरकारची भागीदारी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन(ओएनजीसी)ला विकण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. केंद्र सरकारनं जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधली सरकारची 51.11 टक्क्यांची भागीदारी आता ओएनजीसी विकत घेणार आहे. त्यानंतर अतिरिक्त भागीदारीसाठी कोणतीही अट ठेवण्यात येणार नाही. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सरकारी भागीदारी ओएनजीसी विकत घेण्याचा व्यवहार एका वर्षात पूर्ण होणार आहे. ओएनजीसीमध्ये एचपीसीएलचं विलीनीकरण झालं तरी एचपीसीएल या ब्रँडचं नाव कायम राहणार आहे. या व्यवहारानंतर एचपीसीएल ही भारतातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक कंपनीची उपकंपनी म्हणून समोर येणार आहे. विदेशी दलाली CLSA रिपोर्टनुसार, या विलीनीकरणामुळे केंद्र सरकारला फायदा होणार आहे. केंद्र सरकारला एचपीसीएल कंपनीवर ओएनजीसीच्या माध्यमांतून नियंत्रण ठेवण्यास मदत मिळणार आहे.

आणखी वाचा(ओएनजीसी-एचपीसीएलचे विलीनीकरण लवकरच)(ओएनजीसीची रशियात 15 टक्के हिस्सा खरेदी)(ओएनजीसीतून निर्गुंतवणूक नाही)

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, 2017-18 या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण होईल. दोन्ही कंपन्यांच्या एकीकरणानंतर 40 अब्ज डॉलरचे मूल्य असलेली नवी कंपनी अस्तित्वात येईल. विलीनीकरणाच्या वृत्तानंतर दोन्ही कंपन्यांच्या समभागांनी शेअर बाजारात मोठी उसळी घेतल्याचे दिसून आले होते. ओएनजीसी-एचपीसीएलच्या विलीनीकरणाच्या वृत्तामुळे इंडियन ऑइल कॉर्पोशन (आयओसी) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या अन्य सरकारी तेल कंपन्यांचे समभागही तेजीत आले.
>तेल शुद्धीकरणात भर
एचपीसीएलचे बाजार भांडवल 51,764.25 कोटी रुपयांचे आहे. सरकारी मालकीचा सर्व 51.11 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी ओएनजीसीला 26,450 कोटी रुपये लागतील. यानंतर ओएनजीसीच्या वार्षिक तेल शुद्धीकरण क्षमतेत 23.8 दशलक्ष टनांची भर पडेल. ओएनजीसी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची तेल शुद्धीकरण कंपनी बनेल.