शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

25 वर्षांनंतर FIPB रद्द, नोएडा- ग्रेटर नोएडा मेट्रो रेल्वेला कॅबिनेटची मंजुरी

By admin | Updated: May 24, 2017 20:40 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोएडा-ग्रेटर नोएडा मेट्रो कॉरिडोरला मंजुरी दिली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 24 - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोएडा-ग्रेटर नोएडा मेट्रो कॉरिडोरला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 5.503 कोटी रुपयांचा बजेट निश्चित करण्यात आला आहे. मेट्रो कॉरिडोर हा 29.70 किलोमीटर लांब असणार आहे, अशी माहिती जेटलींनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय मंत्रिमंडळानं मेक इन इंडियाच्या अंतर्गत संरक्षण सामग्री खरेदी करण्याच्या नव्या पॉलिसीलाही मंजुरी दिली होती. तसेच आसामच्या कामरूप जिल्ह्यातील एम्स रुग्णालय स्थापन करण्यासाठी कॅबिनेटनं एकमतानं सहमती दर्शवली आहे. एम्स रुग्णालयाच्या स्थापनेसाठी 1,123 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेत 25 वर्षांपूर्वीच FIPBही पॉलिसीही रद्द केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडताना ही पॉलिसी रद्द करणार असल्याचं जाहीर केलं होतं. देशात थेट स्वयंचलित मार्गानं 90 टक्के विदेशी गुंतवणूक येत आहे. यामुळे एफआयपीबीची गरज कमी होणार आहे. वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांनीही एफआयपीबी बंद करण्याचे सूतोवाच केले होते. संरक्षण सामग्रीचं सर्वाधिक उत्पादन आता देशातच केलं जाणार आहे. जेटली म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून संरक्षण सामग्री मोठी किंमत मोजून विकत घ्यावी लागत होती. त्यामुळेच त्याचं उत्पादन आता भारतात झालं पाहिजे. तसेच संरक्षण पीएसयूच्या कामावरही नजर ठेवण्यात येणार आहे. संरक्षण सामग्रीच्या उत्पादन खासगी सेक्टरच्या कुशल भागीदारीतून सुरू करण्यात येणार आहे.