शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जमीन विकत किंवा भाडेपट्ट्याने घ्या!

By admin | Updated: September 13, 2015 06:16 IST

विविध विकास कामे आणि उद्योगधंद्यांसाठी सरकारने नागरिकांची जमीन कायद्याने संपादित करण्याऐवजी ती रीतसर खरेदी करावी किंवा दीर्घमुदतीने भाडेपट्ट्यावर घ्यावी,

नवी दिल्ली : विविध विकास कामे आणि उद्योगधंद्यांसाठी सरकारने नागरिकांची जमीन कायद्याने संपादित करण्याऐवजी ती रीतसर खरेदी करावी किंवा दीर्घमुदतीने भाडेपट्ट्यावर घ्यावी, असे मत निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी व्यक्त केले आहे.गेल्या वर्षभरात तीन वेळा वटहुकूम काढून लागू ठेवलेल्या सुधारित भूसंपादन कायद्याचा हट्ट मोदी सरकारने सोडून दिल्यानंतर डॉ. पनगढिया यांनी आता मुळात केंद्र सरकारने भूसंपादन कायदा करण्याची गरजही नाही, असे सूतोवाच करून त्याऐवजी हवी असलेली जमीन मिळविण्याचे काही पर्याय सूचविले आहेत. डॉ. पनगढिया म्हणतात की, लोकशाही समाजामध्ये कोणत्याही प्रकारच्या सक्तीला विरोध करणे ही नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. भूसंपादनाच्या संदर्भात याचा अर्थ होतो जमीनमालकाच्या संमतीशिवाय सरकारने त्याची जमीन सक्तीने घेणे. पण खरेदीदार आणि विक्रेता या उभयतांच्या संमतीनेच व्यवहार करायचा असेल तर मुळात ज्यात सक्ती हा अर्थ अभिप्रेत आहे असा भूसंपादन हा शब्द वापरण्याचीही गरज नाही. डॉ. पनगढिया म्हणतात की, असे असले तरी व्यापक जनहित साध्य करण्यासाठी प्रसंगी मालकाच्या संमतीशिवाय त्याची जमीन घेण्याचा अधिकार सरकारला असायला हवा. मात्र पूर्वेतिहास पाहता हा अधिकार कशा स्वरूपात वापरायचा याविषयी काही नवा विचार अनुसरण्याची गरज आहे. (विशेष प्रतिनिधी)पनगढियांचे तीन पर्यायजमीनमालकाच्या संमतीने त्याची जमीन संपादित करण्याऐवजी ती रीतसर खरेदी करावी.‘लॅण्ड पूलिंग’ही जमीनमालकांना अधिक स्वीकारार्ह ठरेल. यात एखाद्या प्रकल्पासाठी जेवढी जमीन हवी असेल त्याहून जास्त जमीन संपादित करायची व प्रकल्प पूर्ण झाल्यावर जास्तीची जमीन मूळ जमीनमालकांना वाटून द्यायची. याचा फायदा असा की, प्रकल्पामुळे त्या जमिनीची किंमत वाढते. ही वाढलेली किंमत प्रकल्पाआधीच्या संपूर्ण जमिनीहून जास्त असल्याने जमीनमालकांना अधिक मोबदला मिळू शकेल.जमीन खरेदी किंवा संपादित करण्याऐवजी दीर्घकालीन भाडेपट्टयाने घ्यायची. हा पर्यायही जमीनमालकांच्या दृष्टीने आकर्षक आहे. कारण जमिनीची मालकी त्यांच्याकडेच राहील, त्यांना भाडेपट्ट्यातून नियमित उत्पन्न मिळत राहील व भाडेपट्याची मुदत संपल्यावर पुन्हा नव्या अटी व शर्ती वाटाघाटीने ठरविण्याचे स्वातंत्र्य त्यास मिळेल.