व्यापार्याची सात लाखाची बॅग लांबविणार्यास अटक
By admin | Updated: July 14, 2016 22:55 IST
जळगाव: अपघात केल्याचा बनाव करून व्यापार्याच्या कारमधील सात लाख रुपयाची रोकड असलेली बॅग लांबविणार्या उपेश मोहन अभंगे (वय २९ रा. नंदुरबार) व अजय उर्फ अजुबा गोपालभाई गांगडेकर (वय १९ रा. अहमदाबाद) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी पहाटे चार वाजता अटक केली. दोघांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
व्यापार्याची सात लाखाची बॅग लांबविणार्यास अटक
जळगाव: अपघात केल्याचा बनाव करून व्यापार्याच्या कारमधील सात लाख रुपयाची रोकड असलेली बॅग लांबविणार्या उपेश मोहन अभंगे (वय २९ रा. नंदुरबार) व अजय उर्फ अजुबा गोपालभाई गांगडेकर (वय १९ रा. अहमदाबाद) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी पहाटे चार वाजता अटक केली. दोघांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. रुपेश चारुदत्त चौधरी हे २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कारने त्यांच्या एमआयडीसीतल कंपनीत जात जात असताना या दोघांनी तुम्ही आमच्या वाहनाला कट मारला त्यात आमचा माणूस जखमी झाल्याचे सांगून चौधरी यांच्याशी हुज्जत घालत कारमधील सात लाख रुपये असलेली बॅग लांबविली होती. दोघंही संशयित कांदीवली पोलीस स्टेशनच्या गुन्ात अटकेत होते. बोरीवली न्यायालयातून दोघांना जळगावच्या गुन्ात वर्ग करण्यात आले.