शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक अमीन सोमजी यांना अटक व जामीन

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

पुणे : जमिनीच्या व्यवहारात लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी व्यावसायिक अमीन अमीरअली सोमजी (वय 41, रा. जगन्नाथ सोसायटी, बोट क्लब रस्ता) यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने काही अटी व शर्तींच्या आधारे जामीन मंजूर केला आहे. ...


पुणे : जमिनीच्या व्यवहारात लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी व्यावसायिक अमीन अमीरअली सोमजी (वय 41, रा. जगन्नाथ सोसायटी, बोट क्लब रस्ता) यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने काही अटी व शर्तींच्या आधारे जामीन मंजूर केला आहे. हा प्रकार 22 फेब्रुवारी ते 13 जुलै 2014 दरम्यान घडला होता.
याप्रकरणी मुराद मददअली पटेल (वय 55, रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली), अमीरअली सोमजी महंमद सोमजी (वय 55, बोट क्लब), महेश मारूती जाधव (रा. कराड रोड, हराळेमळा विटा, सांगली), सुनिल एकनाथ आमले (रा. शितोळे गलली, खानापूर सांगली) तसेच विटा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रविंद्र एम. साळोखे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुराद आणि जाधव यांनी अटकपुर्व जामीन घेतलेला आहे. तर आमीरअली आणि आमले यांचा अटकपुर्व जामीन उच्च न्यायालयाने नामंजूर केला. याप्रकरणी महेबुब अब्दुल गफार शेख (40, माळवाडी हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांच्या आजे सासू जहिराबी इस्माईल शिकलगार यांच्या मालकीची सांगली विटा येथील 1 हेक्टर 55 आर जमीन महेबुब शेख यांना 65 लाखाला विकण्यात आली होती. सावकारीचा व्यवसाय असलेल्या पटेल आणि अमीर अली यांच्याकडून शेख यांनी व्यवसायाकरिता 65 लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जापोटी तारण म्हणून विट्यातील ही जमीन ठेवण्यात आली होती. या दोघांनी त्यावेळी मुळ खरेदीखतासह, सही व अंगठे केलेले कोरे कागद, दस्त व कोरे धनादेश घेतले होते. या कादपत्रांचा दुरुपयोग करीत खोटे बनावट दस्त तयार केले.
त्याचा वापर करुन शेख यांच्याविरूध्द दाखल केलेल्या खटल्याचा निकाल आरोपींच्या विरोधात लागला. त्यानंतर ही मिळकत पटेल आणि सोमजी यांना विकावी म्हणून दबाब टाकायला सुरुवात केली. वारंवार मिळत असलेल्या धमक्यांच्या विरोधात शेख यांनी लष्कर न्यायालयात खाजगी खटला दाखल केला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या अमीन सोमजी यांचा अटपुर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना अटक करुन लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी अमीनच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. परंतु बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे.