शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बस ऑपरेटरवर करणार गुन्हा दाखल

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

कर थकबाकी : वंश निमय इन्फ्राप्रोजेक्टला नोटीसनागपूर : शहरातील स्टार प्रवासी वाहतूक व पोषण आहार टॅक्स वसुलीतून नियमित आवक होत आहे. असे असतानाही परिवहन विभागाचा ७.९३ कोटीचा कर थकीत आहे. याचा तीन दिवसात भरणा केला नाही तर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा मनपा प्रशासनाने शुक्रवारी बस ऑपरेटर वंश निमय ...


कर थकबाकी : वंश निमय इन्फ्राप्रोजेक्टला नोटीस
नागपूर : शहरातील स्टार प्रवासी वाहतूक व पोषण आहार टॅक्स वसुलीतून नियमित आवक होत आहे. असे असतानाही परिवहन विभागाचा ७.९३ कोटीचा कर थकीत आहे. याचा तीन दिवसात भरणा केला नाही तर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा मनपा प्रशासनाने शुक्रवारी बस ऑपरेटर वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट कं पनीला बजावलेल्या नोटीसमधून दिला आहे.
शहरातील स्टार बस वाहतुकीचा प्रवासी कर मागील काही वर्षापासून भरलेला नाही. ही जबाबदारी बस ऑपरेटरची आहे. ऑपरेटरने २००७ साली परिवहन कार्यालयाकडे २५ लाखाचा कर भरला होता. त्यानंतर २००८ साली कराचा भरणा केला नाही. लेखा परीक्षणात यावर आक्षेप नोंदविण्यात आले. याची दखल घेत परिवहन आयुक्त सोनिया शेट्टी यांनी नागपूर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाला पत्र पाठवून मनपाकडून कर वसूल करण्याचे निर्देश दिले. सोमवार १३ जुलैपर्यत कर जमा करण्यासाठी मनपाला मुदत देण्यात आली आहे. गुरुवारी मनपाला हे पत्र मिळाले. शुक्र वारी प्रशासनाने वंश नियम यांना नोटीस बजावून कर न भरल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.(प्रतिनिधी)
चौकट..
कर भरावाच लागेल
परिवहन विभागाचा कर भरण्याची जबाबदारी ऑपरेटरची आहे. तिकीट वसुलीतच याचा समावेश करण्यात आला आहे. मनपा प्रशासन व बस ऑपरेटर यांच्यातील वादाचा याच्याशी कोणताही संबंध नाही. मनपाचे ऑपरेटरकडे ७२ कोटी थकीत आहे. दुसरा ऑपरेटर नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संजय काकडे
उपायुक्त, मनपा