तरूणाला पेटवून देऊन जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
पुणे : उसने पैसे दिले नाहीत म्हणून महंमदवाडीत एका तरूणावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न झाला. हा तरूण ८० टक्के भाजला असून त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
तरूणाला पेटवून देऊन जिवंत जाळण्याचा प्रयत्न
पुणे : उसने पैसे दिले नाहीत म्हणून महंमदवाडीत एका तरूणावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न झाला. हा तरूण ८० टक्के भाजला असून त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिल क्षीरसागर (वय २६, महंमदवाडी)असे तरूणाचे नाव असून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल तीनजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय घुले, अक्षय पोळ आणि दिनेश अशी त्यांची नावे असून त्यांना अटक झाली आहे. गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार महंमदवाडीतील कडवाडी चौकात झाला. क्षीरसागर घुले याच्याकडे वाहनचालक म्हणून कामाला आहे. त्याने घुले यांच्याकडून ५० हजार रूपये उसने घेतले होते. ते परत करत नाही यावरून घुले क्षीरसागर यास मारहाण करीत होता. गुरूवारच्या मारहाणीचे रूपांतर भांडणात होऊन घुले व त्याच्या साथीदारांनी क्षीरसागर याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरिक्षक एस.बी.बर्गे तपास करीत आहेत.