शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनच्या रोज होणार ७० फेऱ्या, दर २0 मिनिटांनी एक ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 06:20 IST

सरासरी प्रवासीक्षमता एक हजार धरल्यास जाणारे ३५ हजार व येणारे ३५ हजार प्रवासी मिळणे आवश्यक आहे

नवी दिल्ली : बुलेट ट्रेनचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. त्यानंतर मुंबई ते अहमदाबादचा प्रवास दोन तासांत पूर्ण होईल. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसी) रेल्वेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.बुलेट ट्रेन स्टेशन जुन्या आणि नव्या साबरमती स्टेशनच्या मध्ये होणार आहे. साबरमतीहून बुलेट ट्रेन निघून अहमदाबादेतीलकालूपूरला येईल. मुंबई (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) ते साबरमती हे अंतर फास्ट ट्रेन २.०७ तासांत पूर्ण करेल. सर्व १२ स्टेशनवर थांबणारी रेल्वे हे अंतर २.५८ तासांत पूर्ण करेल.अधिका-यांनी सांगितले की, सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५ ते ९ या काळात दर तासाला तीन रेल्वे धावतील. म्हणजेच दर २० मिनिटाला एक रेल्वे धावणार आहे. उर्वरित वेळेत एका तासात दोन रेल्वे धावणार आहेत. बुलेट ट्रेनमध्ये सुरुवातीला प्रवाशांची क्षमता प्रति ट्रेन ७५० एवढी असेल. ही क्षमता वाढवून नंतर ती १२५० प्रवासी करण्यात येईल. यासाठी ३५ बुलेट ट्रेन विकत घेतल्या जाणार आहेत.बुलेट ट्रेनचा अधिकाधिक स्पीड ३५० किमी प्रतितास व सरासरी स्पीड ३२० किमी प्रतितास असेल. अहमदाबाद ते मुंबई रेल्वे प्रवासाला ७ तास लागतात. विमानाने एक तास लागतो. या दोन्ही शहरांतून रोज २० रेल्वे धावतात व १० विमानेही निघतात. आता बुलेट ट्रेनही १५ आॅगस्ट २०२२ पासून धावू लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.रोज एवढे प्रवासी मिळतील?मुंबई व अहमदाबाद येथून रोज ३५ बुलेट ट्रेन निघतील. त्यांची सरासरी प्रवासीक्षमता एक हजार धरल्यास जाणारे ३५ हजार व येणारे ३५ हजार प्रवासी मिळणे आवश्यक आहे. इतके प्रवासी रोज बुलेट ट्रेनने प्रवास करतील का, त्यांना तिचे भाडे परवडेल का, हा प्रश्नच आहे