शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

झोपडप˜ीवर चालले बुलडोझर अतिक्रमण जमीनदोस्त : किरकोळ वाद वगळता मोहीम शांततेत

By admin | Updated: May 27, 2016 19:54 IST

जळगाव: जिल्हा दूध संघासमोर सुरत रेल्वे लाईनला लागून असलेल्या झोपडप˜ीवर शुक्रवारी बुलडोझर चालविण्यात आले. अनेक वर्षापासून असलेले हे अतिक्रमण तगड्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. किरकोळ वाद वगळता अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत राबविण्यात आली. या परिसरात तीनशे झोपड्या वजा घरे होती. अतिक्रमणधारकांचे पिंप्राळा हुडकोत पुनर्वसन करण्यात आले आहे.

जळगाव: जिल्हा दूध संघासमोर सुरत रेल्वे लाईनला लागून असलेल्या झोपडप˜ीवर शुक्रवारी बुलडोझर चालविण्यात आले. अनेक वर्षापासून असलेले हे अतिक्रमण तगड्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. किरकोळ वाद वगळता अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत राबविण्यात आली. या परिसरात तीनशे झोपड्या वजा घरे होती. अतिक्रमणधारकांचे पिंप्राळा हुडकोत पुनर्वसन करण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा बलातर्फे ही अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. या अतिक्रमणधारकांना दोन महिन्यापूर्वी घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तर गुरुवारीही रहिवाशांना लाऊडस्पिकरद्वारे आवाहन करण्यात आले होते.नोटीस फलकावर सूचना लिहिण्यात आल्या होत्या. सहायक पोलीस अधीक्षक, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवलनाथ तांबे व रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक गोकुळ सोनोने यांनी या भागात बैठक घेऊन शुक्रवारी हटविण्यात येणार्‍या अतिक्रमण मोहिमेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
अनेक महिला व पुरुष गहिवरले
सकाळी पावणे नऊ वाजता दोन बुलडोझरद्वारे अतिक्रमण तोडण्यास सुरुवात झाली. रेल्वे गेटच्या दिशेने हे अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. रात्री सूचना दिल्यामुळे बहुतांश लोकांनी घरातील सामान हलविला होता, तर काही जणांनी सामानच बाहेर काढला नव्हता.लाकडी पार्टेशनचे घरे व पत्रा असल्याने त्यात त्या वस्तुंचे नुक सान झाले. ज्या घरात इतके वर्ष संसार केला ते डोळ्यादेखत जमीनदोस्त होत असल्याने अनेक कुटुंबांना रडू कोसळले. पोलिसांनीही परिस्थिती समजून या लोकांना धीर दिला.
अधिकार्‍यांचा फौजफाटा
शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता भुसावळ विभागाचे मंडळ सुरक्षा आयुक्त सी.एम.मिश्रा, सहायक पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक आयुक्त अनिरुध्द चौधरी, सुरेशचंद्र, निरीक्षक गोकुळ सोनोने, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवलनाथ तांबे, एमआयडीसीचे निरीक्षक सुनील कुराडे, रामानंदचे प्रवीण वाडीले, जिल्हा पेठचे निरीक्षक श्याम तरवाडकर, नियंत्रण कक्षाचे गाडे पाटील आदी यांच्यासह सहायक निरीक्षक, महिला उपनिरीक्षक व १२० कर्मचारी, ५० महिला कर्मचारी, १२० गॅँगमन, ६ अभियंते आदी बंदोबस्ताला होते.
हैदराबाद येथून मागवला फोर्स
रेल्वे सुरक्षा बलाने हैदराबाद येथून महिला अधिकारी व कर्मचार्‍यांचा अतिरिक्त फोर्स मागविला होता, त्याशिवाय भुसावळ ,नाशिक, मनमाड, चाळीसगाव व अकोला येथून कर्मचारी मागविण्यात आले होते. संभाव्य घटना लक्षात घेता सर्वांना संरक्षण जाळ्या व हेल्मेट पुरविण्यात आले होते. यावेळी दोनजेसीबी व पाच ट्रॅक्टरही मागविण्यात आले होते.