शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
3
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
4
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
5
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
6
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
7
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
8
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
9
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
10
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
11
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
12
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
13
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
14
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
15
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
16
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
17
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
18
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
19
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
20
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

बुलंदशहर : गोळीबार करणाऱ्या जवानाचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 04:28 IST

गोहत्या केल्याच्या कारणावरून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात झालेल्या हिंसाचारात गोळीबार करणा-या जितू नावाच्या लष्करी जवानाचा पोलीस शोध घेत आहेत.

लखनौ : गोहत्या केल्याच्या कारणावरून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात झालेल्या हिंसाचारात गोळीबार करणा-या जितू नावाच्या लष्करी जवानाचा पोलीस शोध घेत आहेत. तो जम्मूत असल्याची माहिती मिळताच, त्याच्या शोधासाठी पोलीस तिथे गेले आहेत. या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व एक जण ठार झाला होता.या हिंसाचाराच्या काही व्हिडिओ फिती पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. त्या बारकाईने पाहिल्यानंतर त्यात एक लष्करी जवान गोळीबार करीत असल्याचे दिसले होते. त्याचे नाव जितू असून, एफआयआरमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याने झाडलेल्या गोळ्यांनीच सुबोधकुमार सिंह व सुमितकुमार या युवकाचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. हा जवान बुलंदशहर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे.हिंसाचारानंतर हा लष्करी जवान तिथून गायब झाला आहे. हा जवान सुट्टी घेऊन गावी परतला होता व त्यानंतर पुन्हा जम्मूमध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी हजर झाला, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले; मात्र तो अद्याप रुजू झालेला नसल्याचे लष्करी अधिकाºयांनी पोलिसांना सांगितले आहे. हिंसाचारासंदर्भात हाती लागलेल्या व्हिडिओमधील सर्व आरोपींचा कसून शोध सुरूआहे. (वृत्तसंस्था)>दोघांची हत्या एकाच पिस्तुलानेपोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमितकुमार यांची हत्या एकाच प्रकारच्या पिस्तुलाने झाली आहे. ते ०.३२ बोअर प्रकारातील पिस्तूल असावे, असा कयास आहे. सुबोधकुमार सिंह यांच्याकडे याच प्रकारचे सर्व्हिस पिस्तूल होते.हिंसाचार करणाºयांनी ते पिस्तूल पळविल्याचा संशय आहे. गोहत्या केल्याच्या कारणावरून जमावाने सुमारे तीन तास हिंसाचार चालविला होता. त्यांची पोलीस व सुरक्षा दलाच्या जवानांशी चकमक झाली. जमावाने वाहने व एक पोलीस चौकीही जाळली.