शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर व पाकिस्तानातून ४७ अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड खर्चाने एक आर्थिक कॉरिडॉर उभारणं भारतासाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 04:05 IST

काश्मीर व पाकिस्तानातून ४७ अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड खर्चाने एक आर्थिक कॉरिडॉर उभे करण्याचे चीनचे राजकारण आपल्या उत्पादनासाठी अरबी समुद्रावर एका मोठ्या बंदराची उभारणी करण्याचे व त्याद्वारे जागतिक बाजारपेठेत लवकर उतरण्याचे आहे.

काश्मीर व पाकिस्तानातून ४७ अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड खर्चाने एक आर्थिक कॉरिडॉर उभे करण्याचे चीनचे राजकारण आपल्या उत्पादनासाठी अरबी समुद्रावर एका मोठ्या बंदराची उभारणी करण्याचे व त्याद्वारे जागतिक बाजारपेठेत लवकर उतरण्याचे आहे. हा कॉरिडॉर काश्मिरातून जात असतानाही भारताचे त्याविषयीचे आक्षेप चीनने अत्यंत उद्दामपणे फेटाळून लावले आहेत आणि जगाचे राजकारणही त्याविषयी मूग गिळून राहिले आहे.ट्रम्प, अ‍ॅबे किंवा मेर्केल यासारखे वजनदार राजकारणीही याबाबत चीनला काही ऐकवू शकले नाही हे येथे महत्त्वाचे व त्याचे जागतिक क्षेत्रातील दुबळेपण भारताच्या लक्षात आणून देणारे आहे. हे वास्तव डोळ््यासमोर असतानाच चीनने आता भारताच्या पूर्वेला असाच एक मोठा कॉरिडॉर म्यानमारच्या प्रदेशातून बंगालच्या उपसागरापर्यंत उभारण्याचा संकल्प जाहीर केला आहे. कित्येक अब्ज डॉलर्स खर्च करून उभारला जाणारा हा कॉरिडॉर भारताची पूर्व बाजूलाही पुरती नाकेबंदी करणारा आहे. या कॉरिडॉरचा वापर दक्षिण चीन व तिबेट येथे तयार होणारा माल अल्पावधीत बंगालच्या उपसागरात व त्यामार्गे हिंदी महासागरात पोहचविण्याचा चीनचा प्रयत्न आहे. हा कॉरिडॉर नसल्यामुळे चीनला आपली उत्पादने दक्षिण चीनचा समुद्र व पॅसिफिक महासागरातून हिंदी महासागरात आणावी लागतात.म्यानमारमधील कॉरिडॉरमुळे त्याचा हा समुद्री फेरा हजारो किलोमीटर्सने कमी होणार आहे. मात्र याचवेळी चीनकडून, काश्मिरातील कॉरिडॉरमुळे भारताची पश्चिमेकडे व म्यानमारमधील कॉरिडॉरमुळे पूर्वेकडे पुरती नाकेबंदी होणार आहे. आर्थिक कॉरिडॉरचे क्षेत्र आर्थिकच नव्हे तर सर्वार्थाने चीनच्या नियंत्रणात राहणार आहे. या आधी असा कॉरिडॉर नेपाळ व बांगलादेश यातून बंगालच्या उपसागरापर्यंत पोहचविण्याचा चीनचा मानस होता. मात्र या दोन देशांच्या दरम्यान भारताचा भूप्रदेश येत असल्यामुळे त्याने ती योजना मागे घेतली आहे. तथापि भारताची पूर्व व पश्चिम या दोन्ही दिशांनी नाकेबंदी करणा-या चीनला भारतावर आपल्या दहशतीची मोठी छाया उभी करता येणार आहे. चीनचे भारताशी असलेले वैर जुने आहे.१९६२ पासूनच चीनने भारताच्या उत्तर सीमेवरील अनेक प्रदेशांवर त्याचा हक्क सांगितला आहे. काश्मीरचा एक तुकडा त्याच्या ताब्यात आजच आहे. अरुणाचलचाही काही भाग चीनच्या नियंत्रणात आहे आणि आता तर चीनने सबंध अरुणाचल हे राज्यच त्याचे असल्याचे जगाला सांगितले आहे. चीनने प्रकाशित केलेल्या नकाशात अरुणाचलचा प्रदेश चीनचा म्हणून दाखविला जातो. त्याचवेळी काश्मीरच्या पूर्वेचे काही भागही चिनी क्षेत्रात हे नकाशे दाखवीत असतात. चीनशी वाटाघाटी करण्याचा व सीमाप्रश्नावर कायम स्वरूपाचा तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न थेट पं. नेहरूंच्या काळापासून सुरू आहे. मात्र चीनचे राज्यकर्ते त्या प्रयत्नांना दाद देताना अद्याप दिसले नाहीत. कोणते तरी निमित्त पुढे करून वाटाघाटी लांबवीत नेणे आणि सीमा प्रश्न जिवंत राहील असेच राजकारण करणे हा त्याच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेचा एक भाग आहे. आपली लष्करी व आर्थिक दहशत सा-या जगाच्या कायम लक्षात राहावी हा चीनचा प्रयत्न आहे. ती तशी ठेवायची तर त्याला सभोवतालच्या देशांवर आपले लष्करी वर्चस्व असल्याचे दाखविणे गरजेचे आहे. यासाठी तो देश भारताचा गेली पाच दशके सातत्याने वापर करीत आला आहे. आता भारताच्या पूर्व व पश्चिम या दोन्ही दिशांना आपला आर्थिक (व लष्करीही) कॉरिडॉर उभा करण्याचे त्याचे राजकारण केवळ अर्थकारणाएवढे मर्यादित आहे असे समजण्याचे कारण नाही. त्याचे एक उद्दिष्ट लष्करीही आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर