शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विकतचे पाणी घेऊन मोफत पुरवठा भारतभूमी संस्थेचा उपक्रम : नागरिकांची भटकंती थांबली

By admin | Updated: July 13, 2015 16:07 IST

एस.आर. मुळे, शिरूर अनंतपाळ : पावसाने दडी मारल्याने सध्या शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रात्री-अपरात्री भटकंती करावी लागत असल्याचे पाहून येथील भारतभूमी सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणी विकत घेऊन टँकरद्वारे मोफत पुरवठा सुरु केला आहे़ या उपक्रमामुळे नागरिकांची सोय झाली आहे.

एस.आर. मुळे, शिरूर अनंतपाळ : पावसाने दडी मारल्याने सध्या शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रात्री-अपरात्री भटकंती करावी लागत असल्याचे पाहून येथील भारतभूमी सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणी विकत घेऊन टँकरद्वारे मोफत पुरवठा सुरु केला आहे़ या उपक्रमामुळे नागरिकांची सोय झाली आहे.
शिरूर अनंतपाळ शहरास घरणी मध्यम प्रकल्पाच्या शिवपूर जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सध्या घरणी मध्यम प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक असून, गाळमिश्रित पाणी आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा नियमित नाही. त्याचबरोबर शहरातील अनेक हातपंप, विद्युतपंप बंद पडले आहेत. परिणामी, तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच पावसाने दडी मारली आहे़ पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा, यासाठी येथील भारतभूमी सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ. अरविंद भातांब्रे यांनी गेल्या १५ दिवसांपासून पाणी विकत घेऊन टँकरने गल्लोगल्ली मोफत पुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
या सेवाभावी संस्थेने पाणी वाटपासाठी चौघांची नियुक्ती केली असून, यात हमीद तांबोळी, नागेश भातांब्रे, श्रीराम गुराळे, शिवकांत संभाळे यांचा समावेश आहे़ ज्या गल्लीत तीव्र पाणीटंचाई आहे, त्यास प्रथम प्राधान्य देऊन पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ दिवसभरात टँकरच्या चार ते पाच खेपा विविध गल्लीत होतात़
चाळीस हजार खर्च...
दरम्यान, जून अखेरपासून सुरू झालेल्या या टँकरवर आजतागायत ४० हजार रुपयांचा खर्च झाला असून, प्रति टँकरला साधारणपणे ८०० रुपये खर्च येत असल्याचे डॉ. भातांब्रे यांनी सांगितले. दरम्यान, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून, पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत मोफत पाणीपुरवठा करण्याचा संकल्प सेवाभावी संस्थेने केला आहे़