शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बसपाची संघटन बांधणी

By admin | Updated: July 7, 2015 01:06 IST

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बसपाची संघटन बांधणी

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बसपाची संघटन बांधणी
पूर्व विदर्भ पदाधिकाऱ्यांची बैठक :
विलास गरुड-वीरसिंह यांचे दिशानिर्देश
नागपूर : महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भात बसपा नव्याने संघटन बांधणीवर भर देत आहे. बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी महाराष्ट्रातही संघटनेची बांधणी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोमवारी बसपाच्या पूर्व विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह उरुवेला कॉलनी येथे पार पडली. या बैठकीत बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि महाराष्ट्राचे प्रभारी खा. वीरसिंह यांनी पदाधिकाऱ्यांना विशेष दिशानिर्देश दिले.
विलास गरुड यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर वॉर्ड, सेक्टर, बूथ आणि पोलिंग कमिटी स्थापन करण्यात यावी. येत्या तीन महिन्यामध्ये हे काम पूर्ण करण्यात यावे. शाहू- फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या बसपाचे संघटन महत्त्वाचे आहे. त्यामुळे संघटनेला कमकुवत करणाऱ्या लोकांना पक्षात कदापि खपवून घेतले जाणार नाही. जे लोक पक्षातून काढण्यात आले ते दुष्प्रचार करीत आहेत. त्याकडे कुणीही लक्ष देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खा. वीरसिंह यांनी काँग्रेस-भाजपावर प्रहार करीत बसपा उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली.
बैठकीला बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, प्रदेश मीडिया प्रभारी सागर डबरासे, प्रेम रोडेकर, विश्वास राऊत, उत्तम शेवडे, संदीप ताजने, विवेक हाडके, पृथ्वीराज शेंडे, मिलिंद बन्सोड आदी उपस्थित होते. जितेंद्र म्हैसकर यांनी संचालन केले. राजकुमार बोरकर यांनी आभार मानले.