शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

बिल्डरांच्या मनमानीला चाप

By admin | Updated: March 11, 2016 04:27 IST

दीर्घकाळापासून प्रतीक्षा असलेले रिअल इस्टेट रेग्युलेटरी विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर झाले. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर, रिअल इस्टेट नियामक ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात येणार आहे

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली दीर्घकाळापासून प्रतीक्षा असलेले रिअल इस्टेट रेग्युलेटरी विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर झाले. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर, रिअल इस्टेट नियामक (रेग्युलेटर) ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात येणार आहे. या कायद्यात भूखंड व सदनिका, दुकाने, कार्यालयांची खरेदी करणाऱ्यांच्या हिताची काळजी घेतानाच बिल्डर्स वर्गाची मनमानी रोखण्याची व्यवस्था आहे. यूपीएच्या काळापासून हे विधेयक संसदेच्या मंजुरीसाठी प्रलंबित होते. हे विधेयक मंजूर व्हावे, यासाठी गत वर्षीही मोदी सरकारने प्रयत्न केले. मात्र, विरोधकांच्या प्रखर विरोधामुळे ते मंजूर होऊ शकले नाही. सदर विधेयकाच्या काही तरतुदी मोदी सरकारने बदलल्याचे समजताच, राहुल गांधींनी दिल्लीत रिअल इस्टेट ग्राहकांच्या मेळाव्यात या बदलांना विरोध केला होता. संसदेत मांडण्यापूर्वी नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडूंनी काँग्रेसच्या आक्षेपानुसार, या विधेयकात काही बदल केले. या बदलांबाबत राहुल गांधी यांनी सकारात्मक भूमिका घेताच सरकारने मांडलेले विधेयक मंजूर झाले. राज्यसभेत विधेयकावरील चर्चेला नायडूंनी उत्तर दिल्यानंतर काँग्रेसच्या विजय दर्डांनी नकाशे मंजूर करताना नव्या तंत्रज्ञानाचा वापर, जमीन माफियांवर कारवाई इत्यादी मुद्द्यांबाबत सभागृहात मंत्र्यांना खुलासे विचारले. तेव्हा नगरविकासमंत्र्यांनी ‘आपण व्यक्त केलेल्या शंकांच्या अनुरूप तरतुदी विधेयकात आहेत, तसेच चर्चेत सुचवलेल्या काही मुद्द्यांचा समावेश करण्यात येईल, असा खुलासाही केला.> या विधेयकातील ठळक वैशिष्ट्ये प्रत्येक राज्यात रिअल इस्टेट रेग्युलेटर यंत्रणा कार्यरत होणार असून, प्रत्येक गृहनिर्माण व वाणिज्य प्रकल्पांवर त्याची देखरेख असेल. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारणही ही यंत्रणा करील.प्रत्येक बिल्डरला यापुढे बांधकामाची विक्री सुपर बिल्टअपनुसार नव्हे, तर कार्पेट एरियानुसारच करावी लागेल. ग्राहकांना मिळकतीचा ताबा दिल्यानंतर बिल्डरला ३ महिन्यांत इमारतीची मालकी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनला द्यावी लागेल.कबूल केलेल्या तारखेनंतर मिळकतीच्या हस्तांतरणाला अनावश्यक विलंब झाल्यास वा बांधकामात दोष आढळल्यास विकासकाला व्याज व दंड भरावा लागेल.ग्राहकांकडून वसूल केलेली रक्कम १५ दिवसांत बँकेत एस्क्रो अकाउंटच्या स्वरूपात भरावी लागेल. त्यातील ७0% रक्कम त्याच प्रकल्पावर खर्च करावी लागेल .प्रकल्प सुरू होत असताना बिल्डर अथवा विकासकाला प्रकल्पाविषयी पूर्ण माहिती वेबसाइटवर प्रदर्शित करावी लागेल. प्रकल्पाचे किमान क्षेत्रफळ ५00 चौरस मीटर्सचे असणाऱ्या म्हणजेच ८ सदनिकांच्या छोट्या प्रकल्पांनाही कायदा लागू होईल. प्रकल्पात बिल्डर्सना काही बदल करावेसे वाटल्यास बुकिंग करणाऱ्या ६६% ग्राहकांची अनुमती अनिवार्य असेल. प्रस्तावित कायद्याचे नियम केवळ गृहनिर्माण प्रकल्पांनाच नव्हे, तर वाणिज्य मिळकतींनाही लागू होतील.रेग्युलेटर यंत्रणेकडे प्रकल्प विकसित करणाऱ्या बिल्डर्स, डेव्हलपर्स व एजंट्सना नोंदणी करावी लागेल.प्रकल्प लवकर मंजूर व्हावेत, यासाठी एकखिडकी क्लिअरन्सच्या तरतुदीचा समावेश विधेयकात आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण लवकर होण्यासाठी तरतूद.