शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पातील आकडेच संशयास्पद; काँग्रेसचा आरोप

By admin | Updated: February 2, 2017 02:36 IST

यंदाचा अर्थसंकल्प दिशाहीन असून, अत्यंत निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले की, सरकारने अर्थसंकल्पात दिलेली

- हरिश गुप्ता, नवी दिल्ली

लोकसभेचे सदस्य ई. अहमद यांचे बुधवारी पहाटे अचानक निधन झाले. प्रथा वा संकेताप्रमाणे सभागृहाचे कामकाज स्थगित केले जाते. याच प्रथेचा आधार घेत सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे व अर्थसंकल्प दुसऱ्या दिवशी सादर करावा असा आग्रह करून काँग्रेसने तत्वत: राजकीय पेचप्रसंग निर्माण केला होता. सभागृह स्थगित करून अर्थसंकल्प मांडणेही स्थगित करावे अशी काँग्रेसची इच्छा होती.लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना सकाळी साडेदहा वाजता भेटले व अर्थसंकल्प उद्यापर्यंत लांबणीवर टाकावा, अशी मागणी केली. राष्ट्रपतींनी अर्थसंकल्प मांडण्यास परवानगी दिली असून तो मांडणे ही घटनात्मक गरज आहे, असे महाजन यांनी शिष्टमंडळाला सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरे म्हणजे सभागृहाचे कामकाज स्थगित करणे हा संकेत आहे. परंतु कायद्यात तशी तरतूद नाही. परंतु शिष्टमंडळाने केवळ अर्थसंकल्प मांडायचा आहे म्हणून संकेत मोडला जायला नको, असा युक्तिवाद केला. अर्थसंकल्प दोन फेब्रुवारी रोजी सादर केला गेला तर काही आभाळ कोसळणार नाही, असे खरगे म्हणाले. ही बैठक सुरू असताना लोकसभा सचिवालयाचे अधिकारी महाजन यांच्याकडे धावत आले. त्यांनी त्यांच्या हे निदर्शनास आणले की लोकसभेच्या विद्यमान सदस्याचे निधन झाल्यानंतरही अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दोन वेळा असे झाले व या दोन्ही वेळेस सरकार काँग्रेसचे होते.१९ एप्रिल १९५४ रोजी पॉल जे सोरेन यांचे निधन झाले होते. मात्र, लोकसभेत संध्याकाळी रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तर, ३० जुलै १९७४ रोजी उद्योग राज्य मंत्री एम. बी. राणा यांचे निधन झाले. काँग्रेस पक्षासाठी हा धक्का होता. सकाळी ११.०५ वाजता लोकसभा तहकूब करण्यात आली. पण, त्याच दिवशी रात्री कामकाज पुन्हा सुरू झाले. तत्कालिन इंदिरा गांधी सरकारने त्याच रात्री अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प पुढे ढकलण्याचा असा पायंडा नाहीहे संदर्भ बुधवारी सभागृहात देण्यात आले आणि सरकारने अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पुढे पाऊल टाकण्याचे सूचित केले. त्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थात, गुुरुवारी लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात येईल, असे सर्वानुमते ठरले. लोकसभेतील माजी महासचिव सुभाष सी. कश्यप म्हणाले की, अर्थसंकल्प पुढे ढकलण्याचा असा कोणताही पायंडा नाही.