शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बजेटचा राजकीय फायदा उठवण्याचा विचार नाही

By admin | Updated: January 31, 2017 00:22 IST

पाच राज्यातील निवडणुकांच्या आधी अर्थसंकल्प सादर करून, केंद्रातील भाजपा सरकार राजकीय फायदा उठवू पाहत असल्याच्या आरोपाचा सरकारने इन्कार केला. अर्थसंकल्पाद्वारे

नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुकांच्या आधी अर्थसंकल्प सादर करून, केंद्रातील भाजपा सरकार राजकीय फायदा उठवू पाहत असल्याच्या आरोपाचा सरकारने इन्कार केला. अर्थसंकल्पाद्वारे सरकार राजकीय फायदा उठवू पाहत असल्याचे आरोप खरे नाहीत, असे सरकारने म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारपासून सुरू होत आहे. त्याआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, निवडणुकीच्या काळातील मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी काम करण्याची गरज आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने जाहीर केला आहे. आजच्या सर्वपक्षीय बैठकीवर सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेनेही बहिष्कार घातला होता. बैठकीनंतर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, हा अर्थसंकल्प निवडणुकांवर प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे तूर्तास अर्थसंकल्प सादर करण्यात येऊ नये. सीबीआयचा दुरुपयोग करुन आपल्या पक्षाच्या एका खासदाराला अटक केल्याचा आरोप करत हा मुद्दा आगामी अधिवेशनात मांडणार असल्याचे तृणमूलने स्पष्ट केले आहे. या बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी सर्व पक्षांना सहकार्य मागितले आहे. निवडणूक काळात आमच्यात काही मतभेद होऊ शकतात. पण, संसद महापंचायत आहे. येथे सर्वांनी मिळूून काम करण्याची गरज आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पुन्हा नोटाबंदीचा मुद्दानोटाबंदीचा मुद्दा पुन्हा मांडणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. याच मुद्यावरुन गत अधिवेशनात कामकाज होऊ शकले नव्हते. काँग्रेस आणि माकपच्या नेतृत्वातील विरोधी पक्षांनी या सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले की, नोटाबंदीच्या मुद्यावर चर्चा व्हायला हवी. नोटाबंदीला कडाडून विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने बैठकीला हजेरी लावली नाही. - बैठकीनंतर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, हा अर्थसंकल्प निवडणुकांवर प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे तूर्तास अर्थसंकल्प सादर करण्यात येऊ नये.