शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

बसपा खासदाराला पत्नी व मुलासह अटक

By admin | Updated: April 7, 2016 19:49 IST

बहुजन समाज पार्टीचे (बसपा) खासदार नरेंद्र कश्यप यांना त्यांची पत्नी व मुलासह सुनेच्या मृत्यूप्रकरणी हुंडाविरोधी कायद्याअंतर्गत गुरुवारी अटक करण्यात आली.

हुंडाबळीप्रकरणी: सुनेचा मृतदेह आढळला

गाझियाबाद: बहुजन समाज पार्टीचे (बसपा) खासदार नरेंद्र कश्यप यांना त्यांची पत्नी व मुलासह सुनेच्या मृत्यूप्रकरणी हुंडाविरोधी कायद्याअंतर्गत गुरुवारी अटक करण्यात आली. राज्यसभा सदस्य असलेले कश्यप आणि त्यांच्या पत्नी देवेंद्री गेल्या दोन दिवसांपासून छातीत दुखत असल्याच्या कारणावरून स्थानिक हॉस्पिटलमध्ये भरती होते. कविनगर पोलिसांनी कश्यप दाम्पत्यास तेथून अटक केली. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा सागरलाही अटक करण्यात आली आहे. सागर मृत हिमांशीचा पती आहे. २९ वर्षीय हिमांशी बुधवारी संजयनगरमधील त्यांच्या निवासस्थानाच्या बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिच्या डोक्याला गोळी लागली होती. प्राथमिक चौकशीत हे हुंडाबळीचे प्रकरण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी काल कश्यप, देवेंद्री, सागर, कश्यप यांच्या दोन मुली शोभा व सरिता आणि सागरचा लहान भाऊ सिद्धार्थ यांच्याविरुद्ध भांदविच्या ४९८ ए (पती अथवा त्याच्या कुटुंबीयांकडून छळ), ३०४ बी (जळाल्याने अथवा इजा झाल्याने महिलेचा मृत्यू) आणि हुंडाविरोधी कायद्याच्या कलम तीन व चार अन्वये गुन्हा नोंदविला होता. बसपाचे माजी मंत्री हिरालाल कश्यप यांची मुलगी हिमांशी हिचा तीन वर्षांपूर्वी सागरसोबत विवाह झाला होता. या दाम्पत्याला एक वर्षाचा मुलगाही आहे. नरेंद्र कश्यप यांचे कुटुंब हुंड्यासाठी आमच्या मुलीचा अतोनात छळ करीत होते,असा आरोप मृत हिमांशीचे काका हरिओम कश्यप यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. (वृत्तसंस्था)