सुधारित बीएसएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; एक ठार, चार जखमी
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
माल्दा : भारतीय सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) एका जवानाने मंगळवारी आपल्या सर्व्हिस रायफलमधून कथितरीत्या आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार करीत एकाचा जीव घेतला तर अन्य चौघांना जखमी केले़ बसंत सिंह असे या जवानाचे नाव आहे़ घटनेनंतर तो फरार असून त्याचा शोध सुरू आहे़
सुधारित बीएसएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; एक ठार, चार जखमी
माल्दा : भारतीय सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) एका जवानाने मंगळवारी आपल्या सर्व्हिस रायफलमधून कथितरीत्या आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार करीत एकाचा जीव घेतला तर अन्य चौघांना जखमी केले़ बसंत सिंह असे या जवानाचे नाव आहे़ घटनेनंतर तो फरार असून त्याचा शोध सुरू आहे़बीएसएफच्या माल्दा सेक्टरचे महासंचालक राजसिंह राठौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरक्कानजीक १७ मैलावर तैनात २० व्या बटालियनच्या बसंत सिंहने कथितरीत्या झोपलेल्या सहकाऱ्यांवर अचानक अंदाधुंद गोळीबार केला़ यात हेड कॉन्स्टेबल मूलचंद याचा घटनास्थळीच मृत्यू झाला़तर अन्य चौघे जखमी झाले़ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे़ सिंहने हे कृत्य का केले, हे अद्याप कळलेले नाही़ तपास सुरू आहे़