शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक्झिटमुळे भारतीयांना ब्रिटनची सहल स्वस्त

By admin | Updated: July 13, 2016 02:43 IST

मौजमजेसह भारतीयांना सुट्टी घालवायची असेल, ब्रिटन खर्चाच्या दृष्टीने अगदी स्वस्तातले ठिकाण बनले आहे. यासाठी ‘ब्रेक्झिट’ला धन्यवादच दिले पाहिजेत.

नवी दिल्ली : मौजमजेसह भारतीयांना सुट्टी घालवायची असेल, ब्रिटन खर्चाच्या दृष्टीने अगदी स्वस्तातले ठिकाण बनले आहे. यासाठी ‘ब्रेक्झिट’ला धन्यवादच दिले पाहिजेत. ब्रिटिश जनतेने ‘ब्रेक्झिट’चा कौल देण्याच्या महिन्यापासून ब्रिटिश चलनाचे (पौंड स्टर्लिंग) मूल्य रुपयांच्या तुलनेत (१०१ वरून ८७ रुपये ३० पैैसे) १३ टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे सहलींचे आयोजन करणाऱ्या भारतातील अनेक कंपन्या या संधीचा लाभ घेण्यासाठी भारतीय पर्यटकांना ‘चला स्वस्तात ब्रिटनला...’ अशी साद घालत आहेत. विमानभाडे आणि व्हिसा वगळता ब्रिटनच्या सहलीचा खर्च १० टक्क्यांनी कमी झाल्याचा या कंपन्यांचा दावा आहे.सात दिवस-रात्रीच्या मुक्कामासह आधी एका जोडप्याला १ लाख ८० हजार रुपये खर्च यायचा. आता तो १ लाख ६२ हजार रुपयांवर आला आहे, असे भारतातील सर्वात मोठ्या ट्रॅव्हल कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.पाच दिवस आणि रात्रीच्या मुक्कामासह विविध पर्यटन स्थळांच्या सैरसफाट्यासाठी माणसी ६४ हजार ६१० रुपये मोजावे लागायचे. आता ६१ हजार ७७९ रुपयांत पाच दिवस मुक्कामासह ब्रिटनची सैर करता येणार आहे. ब्रेक्झिटच्या प्रभावाने पौंडचे मूल्य घसरल्याने हा खर्चही ५ टक्क्यांनी कमी झाला आहे. तेव्हा ब्रिटनची सैैर आधीच्या तुलनेत खूपच स्वस्त झाली आहे, यात दुमत नाही, असे ट्रॅव्हल पोर्ट ‘यात्रा’चे अध्यक्ष शरत ढाल यांनी म्हटले आहे.गेल्या महिनाभरात पौंडचे मूल्य १२ टक्के घसरल्याने भारतीयांना ब्रिटनची सैर करण्याची पर्वणीच लाभली आहे. ब्रिटन सहलीचा खर्च किमान १० टक्क्यांनी कमी होईल. तेव्हा मादाम तुसात, लंडन आय यासारख्या आकर्षक स्थळांना भेट देण्याच्या खर्चासह भोजन खर्चही स्वस्त होईल. ब्रिटनमधील खरेदीही १० टक्क्यांनी कमी होणार असल्याने, भारतीयांना मनसोक्त खरेदी करता येईल. ही पर्वणी साधत नजीकच्या काळात भारतीय मोठ्या संख्यने ब्रिटन वारीसाठी नोंदणी करतील, अशी आशा कॉक्स अँड किंग्जचे करण आनंद यांना आहे. भारतीयांना ब्रिटनचे भारी आकर्षण आहे. २०१५ मध्ये साडेचार लाख भारतीयांनी ब्रिटन भेट दिली होती. या वर्षी यात किमान १५ टक्के वाढ होईल, असेही त्यांना वाटते.