शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उत्फुल्ल वातावरणामुळे प्रकाशोत्सवाला आगळा रंग

By admin | Updated: October 30, 2016 22:46 IST

पुणे : दिवाळीचा परमोच्चबिंदू असलेला लक्ष्मीपुजनाचा सण आज सायंकाळनंतर अतिशय उत्साहात साजरा झाला. मनामनातला अंधार दूर करणा-या प्रकाशोत्सवाचे उत्फुल्ल वातावरणात स्वागत झाले. घरोघर फुलांच्या, आंब्याच्या तोरणमाळा लावून लक्ष्मीचे स्वागत करण्यात आले. सुरेख सजलेल्या रांगोळ्यांमुळे, मंद तेवणा-या पणत्यांमुळे देखणेपणा ल्यायलेल्या घरांचे रुप दृष्ट लागेल असे दिसत होते. अमावस्येच्या रात्री शहराचा आसमंतात ...



पुणे : दिवाळीचा परमोच्चबिंदू असलेला लक्ष्मीपुजनाचा सण आज सायंकाळनंतर अतिशय उत्साहात साजरा झाला. मनामनातला अंधार दूर करणा-या प्रकाशोत्सवाचे उत्फुल्ल वातावरणात स्वागत झाले. घरोघर फुलांच्या, आंब्याच्या तोरणमाळा लावून लक्ष्मीचे स्वागत करण्यात आले. सुरेख सजलेल्या रांगोळ्यांमुळे, मंद तेवणा-या पणत्यांमुळे देखणेपणा ल्यायलेल्या घरांचे रुप दृष्ट लागेल असे दिसत होते. अमावस्येच्या रात्री शहराचा आसमंतात प्रकाशात न्हाऊन निघाला होता.
अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपुजन साजरे होते. त्यासाठी पुणेकर शनिवारपासूनच सज्ज होते. आज रविवारचा दिवस असल्याने सकाळपासूनच शहरावर निवांतपणाची छाया होती. घरातच थांबून कुटुंबियांसह सणाचा आनंद घेतला गेला. सायंकाळच्या लक्ष्मीपुजनाची तयारी दुपारीच केली जात होती. गोडधोड पक्वान्नांचा नैवेद्य दाखविल्यानंतर भरगच्च भोजन भोजनाचा स्वाद घेतल्यानंतर पुणेकरांनी काहीशी वामकुक्षी घेतली.
सूर्य पश्चिम क्षितीजाकडे झुकू लागताच दारांवर पिवळ्याधमक , केशरी झेंडुच्या माळा लावण्यात आल्या. अंगणात रांगोळी काढण्यात आली. सकाळनंतर मालविलेले आकाशदिवे पुन्हा झगमगू लागले. सायंकाळी ६ ते रात्री पावणेनऊ दरम्यान लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त होता.
अमावस्या अशुभ मानली जाते. मात्र अश्विन अमावस्या आनंदी असते. त्यामुळे व्यापारी वर्गाने दुपारीच व्यवहार बंद करुन पुजेची तयारी सुरु केली. सायंकाळी महत्वाच्या बाजारपेठांमध्ये पुजेचे वातावरण दिसत होते. घरोघरच्या आणि व्यापारी पेढ्यांमधील पुजा पूर्ण होताच फटाक्यांच्या धमाक्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. आकाशात होणारी आतषबाजी डोळे खिळवून ठेवत होती.
अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मीचा सर्वत्र संचार असतो अशी आणि आजच्या रात्री घरातील केर झाडून बाहेर टाकावा, दारिद्रय निस्सारण करावे अशी श्रध्दा असल्याने रात्री उशीरापर्यंत पुणेकरांमध्ये जाग होती. आज दिवाळीचा परमोच्चबिंदू असल्याने आप्त मित्रांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे सोशल मिडीयावरुन भेटून शुभेच्छा दिल्या जात होत्या. या सा-या वेळेत सार्वजनिक वाहतूक कमालीची मंदावली. रस्त्यांनीही जणू विश्रांती घेत उत्सवाच्या आनंदात सहभाग नोंदविला.