थोडक्यात वृत्त...
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
विद्यार्थ्यांकडून रक्तदान (फोटोसह बातमी)
थोडक्यात वृत्त...
विद्यार्थ्यांकडून रक्तदान (फोटोसह बातमी) अहमदनगर : व्हॅलेन्टाईन डे निमित्त शनिवारी न्यू आर्टस विद्यालयात ७२ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांच्याहस्ते झाले. यावेळी एम.व्ही. गिते. उपप्राचार्य एस.एस. जाधव, प्रा. आर.जी. जाधव यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते. ....................आंदोलनाचा निर्णय अहमदनगर : माजी राज्यमंत्री उत्तम खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध मागण्यासाठी गुरूवारी भिंगार येथे झालेल्या बैठकीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लहूजी वस्ताद यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यातील संगमवाडीतून आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला शंकर वानखेडे, उषा अडागळे, राकेश लोंढे, दिगंबर जोगदंड, किसन जाधव आदी उपस्थित होते. .....................मोफत शिबिराला प्रारंभ अहमदनगर : आनंदऋषीजी रुगणालयात विविध रोगांची मोफत तपासणी व सवलतीच्या दरातील शस्त्रक्रिया शिबिराला शनिवारी प्रारंभ झाला. मंगल रुणवाल यांच आर्थिक योगदानातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन उद्योजक श्रीमाळ परिवाराकडून करण्यात आले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले........................४० महिलांना प्रशिक्षण अहमदनगर : जिल्हा उद्योग केंद्र व राज्य उद्योजकता विकास कंेद्र यांच्यावतीने केटरिंग तंत्रज्ञानावर महिनाभरासाठी प्रशिक्षण शिबिर परपडले. या प्रशिक्षणात ४० महिलांनी सहभाग नोंदविला होता. १२ जानेवारी ते १२ फेबु्रवारी दरम्यान हे शिबिर पारपडले. दिपाली बिहाणी यांनी वेळी महिलांना मार्गदर्शन केले. .................