शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात वृत्त

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम
अहमदनगर : सारसनगरमधील राधाकृष्ण मंदिरात श्रीदेवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार ( दि. २०) पासून गोविंद महाराज जाटदेवळेकर श्रीदेवी भागवत कथा सांगणार आहेत. यावेळी मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचा एकाहत्तरी महोत्सव साजरा केला जाणार आहे.
..................
गाळ काढण्यास सुरूवात
अहमदनगर : मदडगाव येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावातील तलावातून गाळ काढण्यास शुक्रवारी सुरूवात झाली आहे.
यावेळी तहसीलदार सुधीर पाटील, सरपंच अनिल शेडोळे, शाखा अभियंता व्ही. आर. खोटे, कृषी सहाय्यक वाय. सी. देशमुख, ग्रामसेवक बी.बी. जाधव आदी उपस्थित होते.
...................
पिके धोक्यात
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ हवामान आहे, यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या हवामानाचा सर्वाधिक धोका भाजीपाला पिकांना बसत असून उन्हाचा कडाका आणि ढगाळ हवामान यामुळे पिकांचे दुहेरी नुकसान होत आहे.
..................
चालकांची आरोग्य तपासणी
अहमदनगर : एसटी महामंडळाने १९७ चालकांची आरोग्य तपासणी केली. महामंडळाकडून सध्या चालकांची आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. नगर विभागतील १९७ कर्मचार्‍यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित चालकांच्या तपासण्या लवकरच करण्यात येणार आहेत. दोन वर्षापासून चालकांची ही आरोग्य तपासणी रखडलेली आहे.
...................
वेळ बदलण्याची मागणी
अहमदनगर : जिल्ह्यातील अंगणवाड्यांची वेळ बदलण्याची मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे. सध्या फेबु्रवारी महिना सुरू झाला असून उन्हाचा तडाखा वाढलेला असून त्याचा फटका बालकांना बसणार आहे. यामुळे अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत करण्याची मागणी आहे.
.....................
शाळेचे काम रखडले
अहमदनगर : वांबोरी (ता. राहुरी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे सहा महिन्यांपूर्वी पत्रे उडाले होते. या कामासाठी जिल्हा परिषदेकडून निधीही मंजूर करण्यात आला असून अद्यापही कामाला सुरूवात झालेली नाही. यामुळे या शाळा खोल्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
......................
चित्रकला परीक्षेत यश
अहमदनगर : सारसनगर येथील दामोधर विधाते विद्यालयाने राज्य कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला इलेमेंटरी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. विद्यालयातील ३२ पैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १० विद्यार्थ्यांना बी ग्रेड मिळाला आहे.
...................