शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

थोडक्यात

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

रिव्हॉलवरच्या धाकात लाखोंंची लूट

रिव्हॉलवरच्या धाकात लाखोंंची लूट
मंुबई: रिव्हॉलवरचा धाक दाखवून लोकमान्य टिळक मार्गावरील एका कार्यालयात शिरलेल्या चार लुटारूंनी तेथून सुमारे १५ लाखांचा ऐवज लुटला. ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी लो. टि. मार्ग पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. लुटमारीआधी आरोपींनी कार्यालयातील जितेंद्र अमरसिंग राजपुरोहित या कर्मचार्‍याचे रिव्हॉल्वरच्या धाकात हातपाय बांधले,त्याला मारहाणही केली.

मौलवीकडून चिमुरडीचा विनयभंग
मुंबई - गोवंडी, शिवाजी नगरमधील एका मदरशामध्ये अरबी शिकवणार्‍या मौलवीला पोलिसांनी अटक केली. महोम्मद उस्मान शहा(४०) असे अटक आरोपीचे नाव आहे. मदरशात शिकणार्‍या सात वर्षांच्या चिमुरडीने केलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी शहा याला अटक केली. त्याने याआधी मदरशातल्या अन्य मुलींवर अत्याचार केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.


बोगस पत्रकाराला अटक
मुंबई: रेशनिंगचा काळाबाजार प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणार्‍या तोतया पत्रकाराला भांडुप पोलिसांनी अटक केली. वैभव सावंत(३८) असे आरोपीचे नाव असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. भांडुप टंेभीपाडा परिसरात असलेल्या रेशनिंग दुकानदार रतनजी गाला यांंच्याकडे त्याने महिना ५ हजाराची मागणी केली होती.


बोरिवलीतील बेपत्ता व्यवसायिकाचा मृतदेह मढ बिचवर
मुंबई : आठवड्यापूर्वी बोरिवलीतून बेपत्ता झालेल्या व्यवसायिकाचा मृतदेह मालाडच्या मढ बिचवर सापडला. व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. विपूल शाह असे या व्यवसायिकाचे नाव असून तो मुळचा बोरिवलीचा रहिवासी आहे. बोरिवलीत त्याचे इमीटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. सात फेब्रुवारीपासून विपुल घरातून बेपत्ता झाला होता. सर्वत्र शोधल्यानंतरही त्याचा काहीच पत्ता न लागल्याने त्याच्या पत्नीने तो हरविल्याची तक्रार बोरिवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विपुल कर्जबाजारी होता, त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मालवणी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.