संक्षिप्त
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
संक्षिप्त
संक्षिप्त
संक्षिप्तप्रवाशांची कुचंबणानागपूर : सीताबर्डी परिसरात स्वच्छतागृहाची सोय नसल्याने स्टार बस प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: महिला प्रवाशांची तर फारच कुचंबणा होते. या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात येत आहे.झाडांमुळे अपघातांची भीती वाढलीनागपूर : नीरी मॉडर्न स्कूल ते माटे चौक या आरपीटीएस लगतच्या मार्गावर झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश नीट येत नाही व त्यामुळे रात्रीच्या सुमारास अपघाताचा धोका वाढीस लागला आहे.दुर्गंधीमुळे नागरिक हैराणनागपूर : टिळकनगर परिसरात राहणारे नागरिक नागनदीत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यांच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत. यासंदर्भात प्रशासनाला वारंवार तक्रारी करण्यात आल्या. परंतु तरीदेखील समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.वाहतुकीचा खोळंबानागपूर : इतवारी येथील गरुडखांब चौकात बहुतांश वेळा सिग्नल सुरू नसल्याने वाहतुकीचा वारंवार खोळंबा होत असल्याचे चित्र पहायला मिळते. या चौकाजवळच शाळा, दवाखाने तसेच मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. विशेषत: सायंकाळच्या वेळी तर येथे फारच अडचण होते. मोकाट प्राण्यांमुळे अडचणनागपूर : गोपालनगर परिसरात मोकाट प्राण्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. मोकाट कुत्रे रात्रीच्या वेळी अचानक दुचाकीस्वारांच्या मागे पळतात. तर डुकरांमुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.