शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

लाचखोर लोकप्रतिनिधींना असावा कायद्याचा धाक

By admin | Updated: January 26, 2017 02:57 IST

लाचखोर लोकप्रतिनिधींमध्ये कायद्याचा धाक असायलाच हवा. त्यांनी जनतेची कामे प्रामाणिकपणे

सीबीआयचे अधीक्षक सुशील प्रसाद सिंह यांचे मत : राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित नागपूर : लाचखोर लोकप्रतिनिधींमध्ये कायद्याचा धाक असायलाच हवा. त्यांनी जनतेची कामे प्रामाणिकपणे आणि कर्तव्यभावनेने करायला हवीत. लाचखोर लोकप्रतिनिधींना आवर घालणे हीच सीबीआयची जबाबदारी आहे, असे मत सीबीआयच्या नागपूर विभागाचे अधीक्षक सुशील प्रसाद सिंह यांनी व्यक्त केले. सिंह यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. यानिमित्त लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला. लोकमतशी चर्चा करताना सिंह म्हणाले, लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे काम करायला हवे. सामान्य नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून खूप अपेक्षा असतात. लाचखोरांची तक्रार करणाऱ्यांचा विश्वास वाढविण्याचे काम सीबीआय करीत आहे. सिंह हे सीबीआयचे स्वच्छ प्रतिमा असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते एप्रिल २०१६ पासून नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत आहेत. ते १९८५ मध्ये उपनिरीक्षक म्हणून सीबीआयमध्ये रुजू झाले होते. त्यांनी आतापर्यंत चंदीगड, मुंबई, पुणे येथे महत्त्वपूर्ण पदांवर कार्य केले आहे. त्यांनी बँक फ्रॉड सेलमध्ये १० वर्षांपर्यंत अनेक मोठ्या घोटाळ्यांचा तपास केला. सीआरपी स्कॅम, हर्षद मेहता शेअर घोटाळा प्रकरणाच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. बँकिंग फ्रॉड सेलमध्ये काम करताना त्यांनी अनेक मोठ्या घोटाळ्यांचा तपास केला आहे. मुंबईत केंद्रीय अबकारी आयुक्ताला २ कोटी ७२ लाखाच्या रोख रकमेसह पकडले होते. नाशिक येथील विजया बँकेत झालेल्या सात कोटी रुपयांच्या घोटाळ्यात २४ किलो ५०० ग्रॅम सोन्याचे २०५ बिस्किट जप्त केले होते. ही त्यावेळची सर्वात मोठी जप्ती होती. या प्रकरणात सहभागी दोन बँक व्यवस्थापकांना सीबीआयच्या न्यायालयाने पाच-पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. सिंह यांना २०१० मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी भारतीय पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कर्मचाऱ्यांसह आठ अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले आहे. तर केंद्रीय अबकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या विरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)