लाचखोर सहायक नगररचना अधिकार्यास अटक
By admin | Updated: September 2, 2015 23:32 IST
कोल्हापूर : खरेदी केलेल्या जमिनीच्या सात-बारा उतार्यावर मालकाचे नाव लावण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेताना सहायक नगररचना अधिकारी समीर अरविंद जगताप याला बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले.
लाचखोर सहायक नगररचना अधिकार्यास अटक
कोल्हापूर : खरेदी केलेल्या जमिनीच्या सात-बारा उतार्यावर मालकाचे नाव लावण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेताना सहायक नगररचना अधिकारी समीर अरविंद जगताप याला बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. समीर अरविंद जगताप (४४, रा. बिबवेवाडी, पुणे, सध्या रा. मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. जगताप याने देसाई यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती पहिल्या टप्प्यात पाच लाखांची मागणी केली होती. त्यानुसार मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर देसाई यांच्याकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना जगतापला अटक केली. त्यानंतर शनिवार पेठेतील कार्यालयात आणून त्याच्याकडे चौकशी सुरू होती. रात्री उशिरा त्याची करवीरच्या कोठडीत रवानगी करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जगतापच्या पुण्यातील घरावरही धाड घातल्याचे कळते. (प्रतिनिधी)