लाचखोर लेखाधिकारी अटकेत
By admin | Updated: September 2, 2015 23:32 IST
औरंगाबाद : निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव नागपूर येथील महालेखापालास ऑनलाईन पाठविण्यासाठी आठ हजार रुपये लाच घेताना वेतन पडताळणी पथकातील लेखाधिकारी अनिल वनगुजरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी पकडले.वनगुजरे वेतन पडताळणी पथकात वर्ग-१चे लेखाधिकारी आहेत. बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या तक्रारदारांनी शासनाच्या एका अध्यादेशानुसार सुधारित वेतनश्रेणी निश्चित करून ...
लाचखोर लेखाधिकारी अटकेत
औरंगाबाद : निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव नागपूर येथील महालेखापालास ऑनलाईन पाठविण्यासाठी आठ हजार रुपये लाच घेताना वेतन पडताळणी पथकातील लेखाधिकारी अनिल वनगुजरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी पकडले.वनगुजरे वेतन पडताळणी पथकात वर्ग-१चे लेखाधिकारी आहेत. बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या तक्रारदारांनी शासनाच्या एका अध्यादेशानुसार सुधारित वेतनश्रेणी निश्चित करून निवृत्ती वेतन मिळावे, यासाठी वनगुजरे यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. प्रस्ताव मंजूर करून ऑनलाईन शिफारस करण्याचे काम वनगुजरे यांच्याकडे होते. तक्रारदार दोन महिन्यांपासून वेतन पडताळणी पथकाच्या कार्यालयात चकरा मारत होते. त्याच्याकडे लाच देण्याची मागणी केली होती. (प्रतिनिधी)