वडनगरीला मुलाने मोडला बापाचा पाय
By admin | Updated: August 14, 2016 01:08 IST
जळगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मुलाने बापाला काठीने मारहाण करीत त्याचा पाय मोडल्याची घटना वडनगरी (ता.जळगाव) येथे १२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १३ रोजी तालुका पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
वडनगरीला मुलाने मोडला बापाचा पाय
जळगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मुलाने बापाला काठीने मारहाण करीत त्याचा पाय मोडल्याची घटना वडनगरी (ता.जळगाव) येथे १२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १३ रोजी तालुका पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.वडनगरी येथील प्रमोद प्रताप सोनवणे याने त्याच्या आईकडून १०० रुपये मागितले. मात्र, पैसे न मिळाल्याने त्याने घरातील भांडी विकायला काढली. याच कारणावरून प्रमोदचा त्याचे वडील प्रताप लोटू सोनवणे (वय ५६) यांच्याशी भांडण झाले. त्यात त्याने वडिलांचा पाय मोडला. याप्रकरणी प्रताप सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोदविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२५, ५०४, ५१० प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास हेड कॉन्स्टेबल संजय चौधरी करीत आहेत.