शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरातील संघर्षात मुलगा ठार

By admin | Updated: September 1, 2016 04:31 IST

काश्मीर खोऱ्यातील काही भागांत पुन्हा हिंसाचार सुरू झाला असून, हिंसक जमावाने बुधवारी पीडीपीचे खासदार नाझीर लावे यांच्या कुलगाममधील निवासस्थानाला आग लावली

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील काही भागांत पुन्हा हिंसाचार सुरू झाला असून, हिंसक जमावाने बुधवारी पीडीपीचे खासदार नाझीर लावे यांच्या कुलगाममधील निवासस्थानाला आग लावली. सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नसले तरी घराचे मात्र नुकसान झाले. तसेच बारामुल्ला जिल्ह्यात हिंसक निदर्शक आणि सुरक्षा दलातील चकमकीत १५ वर्षांचा मुलगा बुधवारी ठार झाला. यामुळे खोऱ्यात सुरू असलेल्या हिंसाचारातील बळींची संख्या वाढून ६९ झाली.

बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दगडफेक करणाऱ्या निदर्शकांवर सुरक्षारक्षकांनी कथितरीत्या केलेल्या गोळीबारात दानीश मंजूर व इतर सहा जखमी झाले. लादोरा भागात ही घटना घडली. दानीशला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात येत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. प्रशासनाने ५३ दिवसांनंतर आज संपूर्ण खोऱ्यातील संचारबंदी उठविली असताना ही चकमक झाली. काश्मिरात आजघडीला कुठेही संचारबंदी नाही.

अगदी श्रीनगरमधील एम.आर. गंज आणि नौहट्टा भागातील संचारबंदीही उठविण्यात आली आहे. स्थिती सुधारल्यामुळे प्रशासनाने संचारबंदी उठविण्याचा निर्णय घेतला असला तरी काही भागांत हिंसाचाराचे तुरळक प्रकार सुरूच आहेत. खोऱ्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संवेदनशील भागात सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.