दोघांना टारगटांची बेदम मारहाण
By admin | Updated: March 16, 2016 08:33 IST
जळगाव- आपल्या मित्राला बांभोरी ता.धरणगाव येथे सोडून येणार्या गोविंद कांबळे (वय १९) व किरण सुरवाडे (वय २३) दोघे रा.शिरसोली नाका, जळगाव यांना १० ते १२ टारगट युवकांनी बेदम मारहाण करून जखमी केले. या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुजराल पेट्रोल पंपानजीक मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
दोघांना टारगटांची बेदम मारहाण
जळगाव- आपल्या मित्राला बांभोरी ता.धरणगाव येथे सोडून येणार्या गोविंद कांबळे (वय १९) व किरण सुरवाडे (वय २३) दोघे रा.शिरसोली नाका, जळगाव यांना १० ते १२ टारगट युवकांनी बेदम मारहाण करून जखमी केले. या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुजराल पेट्रोल पंपानजीक मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुरवाडे व कांबळे हे मित्र संजय शिरसाळे याच्यासोबत शहरातील एका दुकानात काम करतात. रात्री काम आटोपल्यावर नेहमीप्रमाणे तिघे एकाच दुचाकीवरून बांभोरी येथे संजय यास सोडण्यासाठी जात होते. गुजराल पेट्रोल पंपानजीकच्या एका हॉटेलसमोर असलेल्या टारगटांनी तिघांना त्यांच्या दुचाकीवर लिहिलेल्या एका संदेशावरून टोमणा मारला. नंतर वाद झाला व जातीवाचक शिवीगाळ टारगटांनी केली. वाद अधिक न वाढविता तिघे बांभोरीकडे गेले. तेथे संजयला सोडून सुरवाडे व कांबळे आले. या दोघांना टारगटांनी गुजराल पेट्रोल पंपानजीकच्या हॉटेलसमोर अडविले. टारगटांपैकी काहींनी दारू पिलेली होती. पुन्हा त्यांनी वाद घातला व त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यांनी सुरवाडे व कांबळेला लाथाबुक्क्यांसह टॅमीने मारहाण केली. गोविंद कांबळेच्या डोक्याला टाके पडले असून, किरणचा दात पडला आहे. पोलिसातही मारहाणकिरण व गोविंद हे जखमी अवस्थेत तालुका पोलिसात गेले. पोलीस ठाण्याच्या आवारातही टारगट दाखल झाले. आवारातही त्यांना टारगटांपैकी काहींनी पोलिसांसमोर मारहाण केली. यानंतर तक्रार देण्यात आली व गोविंद आणि किरण यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यासंदर्भात तालुका पोलिसात विचारले असता कुणाचीही तक्रार नसल्याने कुणालाही ताब्यात घेतले नाही. या प्रकरणी पोलीस रात्री जिल्हा रुग्णालयात चौकशीसाठी गेले. पण कुणाविरूद्धही गुन्हा दाखल झाला नव्हता.