शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नापाक गोळीबाराला BSF चे चोख प्रत्युत्तर, ७ पाकिस्तानी सैनिक ठार

By admin | Updated: October 22, 2016 07:21 IST

शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी चांगलीच अद्दल घडवली. त्यांच्या गोळीबाराला भारतीय

जम्मू : शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी चांगलीच अद्दल घडवली. त्यांच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने सात पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले आणि सीमा पार करून भारतात घुसू पाहणाऱ्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान गंभीररीत्या जखमी झाला आहे. पाक सीमेवरील रेंजर्सनी सकाळी साडेनऊच्या सुमारास भारतीय हद्दीत गोळीबार सुरू केला. त्यांना तशाच आक्रमक पद्धतीने उत्तर देत बीएसएफच्या जवानांनीही गोळीबार सुरू केला. मात्र शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे प्रत्युत्तर अशा पद्धतीने मिळेल, याचा पाकला अंदाजच नव्हता. त्यामुळे भारतीय जवानांच्या गोळीबारात पाकचे ७ रेंजर्स ठार झाले. कथुआ जिल्ह्यातील दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर हा प्रकार घडला. (वृत्तसंस्था)पाक माध्यमं म्हणतात, दोन्हीकडून झाला गोळीबारपाक माध्यमांनीही दोन्हीकडून जोरदार गोळीबार झाल्याचे वृत्त दिले असून, त्यात ५ पाकिस्तानी रेंजर्स मरण पावल्याचे म्हटले आहे. पाक रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या बीएसएफच्या जवानाचे नाव गुरनाम सिंग असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली. याच भागातून एका पाकिस्तानी दहशतवाद्याने भारतीय सीमेवर घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठीही बीएसएफच्या जवानांना गोळीबार करावा लागला. त्यात दहशतवाद्याचा खात्मा झाला. आता महिलांनी उचलले दगडशुक्रवारच्या नमाजपूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमधील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी आणि उर्वरित भागात जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे १००हून अधिक दिवसांच्या अशांततेनंतर सामान्य होऊ पाहत असलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले. या भागांत यापूर्वी शुक्रवारच्या नमाजनंतर अनेकदा हिंसक निदर्शने झाली. या वेळी काही महिलांनीही पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे काही भागात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बारामुल्लामध्ये शोधमोहीम... बारामुल्लात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली. चार दिवसांपूर्वीही सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या संशयित अड्ड्यांवर धाडी टाकून ४४ जणांना अटक केली होती. तिथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांची संयुक्त पथके अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवीत आहेत. सुरक्षा दलांना अद्याप यश मिळाले नाही. तथापि, शोधमोहीम सुरूच आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितलेपाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री राजौरी जिल्ह्यात ताबा रेषेलगतच्या भारतीय चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता. या भागात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात गेल्या ४ दिवसांपासून चकमकी झडत आहेत. पाकने गेल्या ४ दिवसांत ५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.