चेन्नई : आंध्रातील चित्तूर येथे पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या २० कथित चंदनतस्करांच्या एन्काउंटरप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करा, असे आदेश हैदराबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. तर मद्रास उच्च न्यायालयाने या चकमकीत ठार झालेल्यांपैकी सहा मृतदेहांचे नव्याने शवविच्छेदन करण्याबाबत कुठलाही आदेश देण्यास नकार देतानाच, १७ एप्रिलपर्यंत हे मृतदेह शवागारात ठेवण्याचे निर्देश दिले. मंगळवारी झालेली ही चकमक बनावट आहे, हे सांगणारे अनेक साक्षीदार समोर आल्याने चकमकीच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीबाबत सोमवारी सुनावणी होईल.
एन्काउंटरचे बूमरँग!
By admin | Updated: April 11, 2015 03:58 IST