भाईंदरमधील तरूणाच्या हत्येचे गूढ उकलले
By admin | Updated: February 5, 2016 00:34 IST
मीरा रोड : भाईंदरच्या एका कारखान्यात राहणार्या तरु णाच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदन अहवालाने उकलले आहे. त्याच्या हत्येप्रकरणी नवघर पोलिसांनी गुरु वारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदरमधील तरूणाच्या हत्येचे गूढ उकलले
मीरा रोड : भाईंदरच्या एका कारखान्यात राहणार्या तरु णाच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदन अहवालाने उकलले आहे. त्याच्या हत्येप्रकरणी नवघर पोलिसांनी गुरु वारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम बंगाल येथे राहणार्या सपन संता पान (२२),असे हत्या झालेल्या तरु णाचे नाव आहे. तो दोन वर्षांपासून भाईंदरच्या साईबाबानगर, साईचरण इमारतीतील एका गाळ्यात चालणार्या नकली दागिने बनवण्याच्या कारखान्यात काम करत होता. सदर कारखाना कांचन घोष यांचा असून सपन हा मॅनेजर व अन्य तिघा कारागिरांसह तेथे राहत असे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी मॅनेजर व कारागिरांनी तो उठत नसल्याने नजीकच्या खाजगी रु ग्णालयात व तेथून कांदिवलीच्या शताब्दी रु ग्णालयात नेले. तो मरण पावल्याचे लक्षात आल्याने शताब्दीतील कर्मचार्यांनी पोलिसांचे पत्र आणण्यास सांगितले. मॅनेजर नवघर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी नोंद करून त्याचा मृतदेह टेंबा शवागारमध्ये ठेवला. त्याच्या अंगावर कुठेही साधे खरचटल्याची खूण नव्हती. दुसर्या दिवशी त्याचे वडील आल्यानंतर त्यांनी मुलाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. बुधवारी जे.जे. रु ग्णालयात शवविच्छेदन झाले असता त्याचा मृत्यू ब्रेन हॅमरेजने झाल्याचे निष्पन्न झाले. मृताच्या वडिलांनी त्याच्यासोबत गाळ्यात राहणार्या चौघांवर संशय व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे. प्रतिनिधी