शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बोगस ‘क्लेम’ भोवणार

By admin | Updated: July 17, 2014 02:45 IST

नियमात बसत नसूनही ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी सुटीकालीन प्रवास भत्त्याचा (एलटीए) वापर परदेशी प्रवासासाठी केला आहे,

मुंबई / नवी दिल्ली : नियमात बसत नसूनही ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी सुटीकालीन प्रवास भत्त्याचा (एलटीए) वापर परदेशी प्रवासासाठी केला आहे, तसेच हा भत्ता प्राप्त करून घेण्यास बनावट बिले दिली आहेत, अशा कर्मचाऱ्यांना आगामी दोन एलटीए क्लेम न देण्याची व त्यांची विभागीय चौकशी करण्याची घोषणा कार्मिक मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केली आहे. लोकसभेत या संदर्भात उपस्थित झालेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तराद्वारे त्यांनी ही धोरणात्मक भूमिका जाहीर केली. नियमबाह्य पद्धतीने सरकारी कर्मचारी एलटीए क्लेम घेत असून, केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनेनुसार प्राप्तिकर विभाग याची चौकशी करीत असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने २० जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध केले होते. उपलब्ध माहितीनुसार, दक्षता आयोगाने याचा विस्तृत अहवाल तयार केला आहे. यामध्ये कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य व बनावट एलटीए क्लेम केला याची यादी व त्याची कार्यपद्धती (मोडस ओपरेन्डी) अशी माहिती कॅबिनेट सचिवांना सादर केली. या अनुषंगाने संसदेतही प्रश्नाची विचारणा झाली होती. त्यावर केंद्रीय कार्मिक मंत्र्यांनी दखल घेत अशा कर्मचाऱ्यांना दोन क्लेम न देण्याची धोरणात्मक भूमिका घेतली आहे. त्यांना चालू आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे. तसेच अशा कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीचेही आदेश दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)