शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सायकलवरुन न्यावा लागतो मृतदेह

By admin | Updated: April 19, 2017 09:53 IST

आठ महिन्यांपूर्वी ओदिशामध्ये एका व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन न्यावा लागल्याची दुश्ये समोर आल्यानंतर अनेकजण हळहळले होते.

 ऑनलाइन लोकमत 

मजुली, दि. 19 - आठ महिन्यांपूर्वी ओदिशामध्ये एका आदिवासी व्यक्तीला रुग्णवाहिका नाकारल्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन घेऊन जावा लागला होता. ह्दय हेलावून टाकणा-या या घटनेचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकजण हळहळले होते. आता अशीच एक घटना आसाममध्ये समोर आली आहे. खुद्द आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांच्या माजुली मतदारसंघात वाहन चालवण्यायोग्य रस्ते नसल्याने एका व्यक्तीला आपल्या 18 वर्षीय भावाचा मृतदेह सायकलवरुन न्यावा लागला. स्थानिक वृत्तवाहिनीने ही दृश्ये प्रसारीत केल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 
स्थानिक अधिका-यांनी या घटनेसंबंधी माहिती देताना सांगितले कि, डींपल दास असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते लखीमपूर जिल्ह्यातील बालीजान गावचे रहिवासी होते. दास यांना श्वसानाचा त्रास होत असल्याने सोमवारी पहाटे 3.30च्या सुमारास सहाजण त्यांना सायकलवरुन जोरहाट जिल्ह्यातील गारामुर येथील सिव्हील रुग्णालयात घेऊन आले. तिथे डॉक्टर  डींपल दास यांच्यावर उपचार करत असताना त्यांचा मृत्यू झाला. 
त्यानंतर रुग्णालयाने दास यांचा मृतदेह घरी पाठवण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. पण रुग्णवाहिकेचा चालक येण्याआधीच दास यांच्या नातलगांनी त्यांचा मृतदेह सायकलला बांधला व तिथून निघून गेले अशी माहिती सिव्हील रुग्णालयाचे अधीक्षक मानिक मिली यांनी दिली. 
दास रहात असलेले बालीजान गाव लखीमपूर जिल्ह्यात येते आणि गारामुर येथील सिव्हील रुग्णालय जोरहट जिल्ह्यात आहे. बालीजान गावात वाहन चालवण्यायोग्य रस्ते नाहीत. तिथे राहणा-या नागरीकांना गारामुर येथे येण्यासाठी बांबूचा ब्रिज ओलांडावा लागतो अशी माहिती माजुलीचे पोलिस उपायुक्त पी.जी. झा यांनी दिली.