पंढरपुरात भर वस्तीत मृतदेह आढळला
By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST
१७पंड०६
पंढरपुरात भर वस्तीत मृतदेह आढळला
१७पंड०६पंढरपूर येथील मनमाडकर मठाच्या समोरील बाजूच्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा पडलेला मृत्यदेह. (छाया - सचिन कांबळे)पंढरपूर: येथील मनमाडकर मठाच्या समोरील छोट्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा अत्यंत घृणावस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या दिवसा-ढवळ्या घडलेल्या प्रकारामुळे नेमके या मृतदेहाचे गूढ काय असावे? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.मृतदेह आढळलेल्या ठिकाणी कायम गर्दी असते. कारण त्या परिसरात विद्युत विभागाचे कार्यालय, शाळा तसेच मठ असल्याने त्या परिसरातील रस्त्यावरुन ये-जा करणार्यांची संख्या जास्त असते. त्या परिसरातून शुक्रवारी सकाळी अनेकांनी ये-जा केली. मात्र त्या लहान रस्त्यावर मृतदेह दिसला नाही. मात्र अडीचच्या सुमारास त्याठिकाणी त्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. याची खबर पोलिसांना मिळताच त्या ठिकाणी सपोनि. आर. शेख यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांना अनेक जणांनी सकाळी या ठिकाणी काहीही नसून दुपारी हा मृतदेह दिसून असल्याचे सांगितले.