शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या स्वागतासाठी मंडळाची लगबग

By admin | Updated: September 6, 2016 00:26 IST

देवळा : बाप्पाच्या स्वागतासाठी सोमवारी शहरातील सर्वच मंडळाची लगबग सुरू होती. ढोल, ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यंदा पाऊस समाधानकारक असल्याने गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मंडळानी आकर्षक विद्यूत रोषणाई केली आहे.पिंपळगावी देखाव्याची क्रेझपिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथे मंडळामध्ये देखावे साकारण्यासाठी क्रेझ दिसून येत आहे. मंडळांनी देखावे आकर्षक ...

देवळा : बाप्पाच्या स्वागतासाठी सोमवारी शहरातील सर्वच मंडळाची लगबग सुरू होती. ढोल, ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यंदा पाऊस समाधानकारक असल्याने गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मंडळानी आकर्षक विद्यूत रोषणाई केली आहे. पिंपळगावी देखाव्याची क्रेझपिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथे मंडळामध्ये देखावे साकारण्यासाठी क्रेझ दिसून येत आहे. मंडळांनी देखावे आकर्षक कसे होतील यासाठी परिश्रम घेतले आहेत. पिंपळगाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वाधिक देखावे मंडळानी साकारले आहेत. पोलिसांनी गस्त वाढविलीदेवळा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त वाढविली आहे. शहरातील मोठ्या मंडळाच्या परिसरात पोलिस बंदोबंस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. टोमॅटोच्या भावात किंचित वाढपिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत टोमॅटोची एक लाख १० हजार के्रट आवक झाली होती. बाजारसमितीत टोमॅटोची आवक वाढली आहे. टोमॅटोला प्रति के्रट २५० ते ४५० रुपये एवढा भाव मिळत आहे. टोमॅटोच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. कारवाईची मागणी देवळा : देवळा शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे वातावरण आहे. गर्दी असलेल्या परिसरात धूम स्टाईल मोटारसायकल चालविणार्‍याचे प्रमाण वाढले आहे. धूम स्टाईल मोटारसायकल चालविणार्‍यामुळे अपघात होऊन निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागतात. त्यासाठी अशा दुचाकी चालकावर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.