ऑनलाइन लोकमतलखनऊ , दि. 09 - उत्तरप्रदेशमध्ये राजकीय धुमाकूळ चालू आहे. सर्वच पक्ष आपला प्रचार करत आहेत. मत मिळवण्यासाठी उमेदवार कोणत्याही स्थराला जावू शकतात हे लखनऊ मधील घटनेवरुन दिसून आले. काल उत्तरप्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातल्या खुर्जा मतदारसंघात मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी एका उमेदवाराने सख्ख्या भावाची हत्या केल्याचं समोर आले आहे. रालोद उमेदवार मनोज गौतम यांनी भाऊ विनोद गौतम आणि त्यांचा मित्र सचिन गौतम यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. या हत्यांनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. जमावाला काबूत करण्यासाठी पॅरामिलिट्री फोर्स तैनात करण्यात आले होते. भावाच्या मृत्यूने लोकांमध्ये सहानुभूती निर्माण होऊन निवडणुकीत आपला विजय होईल असा तर्कवितर्क काढत मनोज गौतम यानं हे कृत्य केल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी खुर्जा परिसरातील आंब्याच्या बागेत या दोघांचे गोळ्या झाडलेले मृतदेह सापडले.
रक्तरंजित राजकारण- सहानभुतीसाठी भावाची हत्या
By admin | Updated: February 9, 2017 07:39 IST