शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

खून प्रकरण

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

१९ लाखांच्या वसुलीसाठी

१९ लाखांच्या वसुलीसाठी
खून, चौघांना जामीन नाकारला
नागपूर : फ्लॅटच्या १९ लाखांच्या वसुलीसाठी कट रचून निघृर्णपणे खून केल्याप्रकरणी चार आरोपींचा जामीन अर्ज मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
आशुतोष गजानन वानकर रा. एचबी इस्टेट सोनेगाव, मदनकुमार बाबूलाल श्रीवास, राजू ऊर्फ राजकुमार अशोक गौळकर आणि आशिष नारायण अंबादे, अशी आरोपींची नावे आहेत. संजय प्रभाकर महाजन (४०) रा. पांडुरंग गावंडेनगर प्रतापनगर, असे मृताचे नाव होते.
प्रकरण असे, संजय महाजन याने एचबी इस्टेट सोनेगाव येथे १९ लाखात अर्धा फ्लॅट बिल्डरकडून विकत घेतला होता. ही रक्कम महाजन याने आशुतोष वानकर याला द्यावी, असे ठरले होते. महाजन हा पैसे देत नसल्याने आशुतोषने त्याला कायमचे संपवण्याची योजना आखली होती.
१८ ऑगस्ट २०१४ रोजी दुपारी ३ - ४ वाजताच्या सुमारास आशुतोषने फोन करून महाजन याला बोलावले होते. त्याला एमएच-३१-सीआर-६००१ क्रमांकाच्या टाटा सफारीमधून नेण्यात आले होते. अंबाझरी हिल टॉप भागात त्याचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. त्यानंतर मृतदेह बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिर्सी येथील सुनील कवडू देसाई यांच्या शेतानजीक फेकून देण्यात आला होता. मृताची अंगठी, कडा, गोफ आणि कपडे काढण्यात आले होते. केवळ बनियान आणि अंडरवियर होती.
बेला पोलिसांनी भादंविच्या ३०२, २०१, १२० (ब), १४३, ४०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान मृताची पत्नी प्रियंका हिने पतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अशोक देवतळे यांनी बेपत्ता तक्रारीचा आधार घेत प्रियंका महाजन हिला गाठले होते. तिने आपल्या पतीची ओळख पटवून आशुतोषवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी करताच त्याने खुनाची कबुली दिली होती. त्याने खुनात सहभागी आरोपींची नावे उघड करताच पोलिसांनी मदनकुमार श्रीवास, राजू गौळकर, आशिष अंबादे, राजू धुपे, दीक्षित यांना अटक केली होती. त्यापैकी चौघांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील संदीप डोंगरे, विलास पाघघन आणि अजय माहूरकर यांनी काम पाहिले.