शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ब्लिचिंग, तुरटी, क्लोरिनचा ठणठणाट शुद्ध पाणी पुरवठा धोक्यात: ठेकेदाराने मागितली सक्षम अधिकार्‍याची हमी

By admin | Updated: July 5, 2016 00:29 IST

जळगाव : ऐन पावसाळ्यात महापालिकेच्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्रावर ब्लिचिंगी, पिवळी तुरटी (ॲलम) क्लोरिनचा ठणठणाट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच साठा आता शिल्लक राहिल्याने पाणी पुरवठा विभागाची धावपळ सुरू झाली आहे. पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराकडून ही कोंडी करण्यात आल्याचे वृत्त आहे.

जळगाव : ऐन पावसाळ्यात महापालिकेच्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्रावर ब्लिचिंगी, पिवळी तुरटी (ॲलम) क्लोरिनचा ठणठणाट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच साठा आता शिल्लक राहिल्याने पाणी पुरवठा विभागाची धावपळ सुरू झाली आहे. पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराकडून ही कोंडी करण्यात आल्याचे वृत्त आहे.
शहरातील पाच लाख नागरिकांना वाघूर योजनेवरून पाणी पुरवठा होत असतो. सध्या पावसाळा असल्याने धरण क्षेत्रात नवीन पाणी येत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शहरास शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा असे मनपाचे प्रयत्न आहेत.
आढावा बैठकीत कडक सूचना
जिल्हा प्रशासनाने मान्सून आढावा बैठकीत पाणी पुरवठ्याबाबत सर्वानाच सावध राहून व काळजी घेत पाणी पुरवठा करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात साथ रोगांचा फैलाव होत असतो. या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जावी अशा सूचना आहेत. यासाठी महापालिकेने आपल्या पावसाळी तयारीच्या अहवालात घेण्यात येत असलेल्या काळजीबाबत विशेष उल्लेखही केला आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग, क्लोरिन व ॲलमचा साठा करून ठेवण्यात येत असल्याचे या अहवालात नमूद आहे मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे लक्षात येत आहे.
पाच, सहा दिवसांचा साठा
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ब्लिचिंग, लिक्वीड क्लोरिन गॅस व ॲलम (पिवळी तुरटी) चा केवळ पाच ते सहा दिवस पुरेला एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर हे साहित्य मिळावे असे प्रयत्न पाणी पुरवठा विभागाकडून सुरू झाले असून त्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. ठेकेदारांना वारंवार पत्रव्यवहार करून परिस्थितीचा कल्पना देत. पुरवठा न करणे ही करारातील अटीनुसार कराराचा भंग असल्याबाबत कळविण्यात येत आहे. मात्र तरीही ठेकदार दाद देत नसल्याने पाणी पुरवठा विभागाची डोकेदुखी वाढली आहे. मक्ते दारास दंडाचा इशारा देऊन मनपाकडे असलेल्या अनामत रकमेतून दंडाची वसुली केली जाईल असे स्मरण पत्र देण्यात आले आहे.