शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सिजन कंपनीवर ठपका, पण म्हणे, मृत्यू त्यामुळे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 04:51 IST

बाबा राघवदास मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमध्ये झालेल्या बालमृत्यू प्रकरणी पाच सदस्यीय चौकशी समितीने आॅक्सिजन पुरवठा करणा-या कंपनीवर ठपका ठेवला

लखनौ / गोरखपूर : येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमध्ये झालेल्या बालमृत्यू प्रकरणी पाच सदस्यीय चौकशी समितीने आॅक्सिजन पुरवठा करणा-या कंपनीवर ठपका ठेवला आहे. पुष्पा सेल प्रायव्हेट लिमिटेडने आॅक्सिजन पुरवठ्यात व्यत्यय आणल्याचे यात म्हटले आहे.या हॉस्पिटलमध्ये ७ ते १० आॅगस्ट या काळात ६0 हून अधिक बालमृत्यू झाले. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाची पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने म्हटले आहे की, भूलतज्ज्ञ डॉ. सतीश कुमार हे या प्रकरणात प्रथमदृष्ट्या दोषी दिसत आहेत. त्यांनी त्यांचे कर्तव्य पूर्ण केले नाही.या प्रकरणात चिफ फार्मासिस्ट गजानन जैस्वाल आणि मेडिकल कॉलेजचे तत्कालिन प्राचार्य डॉ. राजीव मिश्रा यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. मृत्यूचे कारण आणि जबाबदार कोण हे निश्चित करण्यासाठी या समितीची नियुक्ती करण्यात आली होती.अर्थात, या समितीचे सदस्य डॉ. रवींद्र कुमार यांनी सांगितले की, हे बालमृत्यू आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे झाले नाहीत. आॅक्सिजन पुरवठा करणारी पुष्पा सेल प्रा. लि. ही लखनौची कंपनी पुरवठ्यातव्यत्यय आणण्यास जबाबदार आहे.या कंपनीची सेवा रुग्णाशीसंंबंधित असून त्यांनी असे करायला नको होते.१०० बेडच्या एईएस वॉर्डचे प्रमुख डॉ. कफिल खान म्हणाले की, वॉर्डमधील एसी चालत नसल्याचे आपण डॉ. सतीश कुमार यांना लेखी सांगितले होते. पण, त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. डॉ. सतीशकुमार ११ आॅगस्ट रोजी विनापरवानगी गैरहजर होते. या समितीने म्हटले आहे की, आॅक्सिजन सिलिंडरची स्टॉक बुक आणि लॉग बुक यांची देखरेख करणे, ही डॉ. सतीशकुमार आणि चीफ फार्मासिस्ट गजानन जैस्वाल यांची ही जबाबदारी होती. पण देखरेख योग्य प्रकारे झाली नाही.लॉग बुकचे प्रभारी डॉ. सतीश यांनी लॉगबुकवर स्वाक्षरी केली नव्हती. याचा अर्थ त्यांनी किंवा प्राचार्यांनी हे प्रकरण गांभीर्यानेघेतले नाही. (वृत्तसंस्था)>आॅडिट, उच्चस्तरीय चौकशी हवीडॉ. मिश्रा १० आॅगस्ट रोजी हॉस्पिटलबाहेर होते. तर, डॉ. सतीश ११ आॅगस्ट रोजी विना परवानगी मुंबईला गेले होते. या अधिकाºयांनी मेडिकल कॉलेज सोडण्यापूर्वी समस्या सोडविल्या असत्या तर ही वेळ आली नसती.बिले सादर न केल्याप्रकरणी यापूर्वीच अकाउंट विभागाच्या दोघे दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विभागाचे आॅडिट करण्याची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची शिफारसही यात करण्यात आली आहे.