शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा : ईडीकडून ९००३ कोटींची संपत्ती जप्त, १७३ आरोपपत्र दाखल

By admin | Updated: April 29, 2015 23:28 IST

सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) काळा पैसा ठेवणारे आणि मनी लाँडरिंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करीत २०१४-१५ या वित्त वर्षात ९००३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली

नवी दिल्ली : सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) काळा पैसा ठेवणारे आणि मनी लाँडरिंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करीत २०१४-१५ या वित्त वर्षात ९००३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आणि १७३ आरोपपत्र दाखल केले.मनी लाँडरिंग विरोधी कायदा (पीएमएलए) आणि विदेशी चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) या दोन प्रमुख कायद्यांतर्गत ईडी वित्तीय गुन्ह्यांचा तपास करीत असते. याशिवाय जुन्या विदेशी चलन नियमन कायद्यांतर्गतही (फेरा) काही प्रकरणांचा तपास ईडी करीत आहे. हा कायदा आता रद्द करण्यात आला आहे. ईडीने यासंदर्भात एक अहवाल तयार केलेला आहे. हा अहवाल काळ्या पैशावरील विशेष तपास पथक (एसआयटी) आणि वित्त मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार, ईडीने २०१४-१५ मध्ये पीएमएलए अंतर्गत ९००३.२६ कोटी रुपये किमतीची संपत्ती जप्त केली. १३२६ पीएमएलए एफआयआर दाखल केले, ५२ लोकांना मनी लाँडरिंगच्या आरोपात अटक केली आणि एकूण १७३ आरोपपत्र दाखल केले. या दरम्यान ईडीने ४९२ जप्ती आदेशही जारी केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)४ईडीने जप्त केलेल्या संपत्तीचे मूल्य मागील वित्त वर्षात ४०७ टक्क्यांनी वाढले. कारण २०१३-१४ मध्ये हे मूल्य १७७३.४१ कोटी रुपये होते. त्यासोबतच अटक करण्यात आलेल्यांची संख्याही ६०० टक्क्यांनी वाढली, तर आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण २१४ टक्क्यांनी वाढले आहे.