शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपाचा जोर

By admin | Updated: September 26, 2014 02:29 IST

स्व. विलासराव देशमुखांविना पोरका झालेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला गड राखण्याचे आव्हान आहे. अडीच लाखाच्या आघाडीने लोकसभेनंतर जिल्ह्यातील भाजपा चैतन्याने तर काँग्रेस सुडाने पेटली आहे.

स्व. विलासराव देशमुखांविना पोरका झालेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला गड राखण्याचे आव्हान आहे. अडीच लाखाच्या आघाडीने लोकसभेनंतर जिल्ह्यातील भाजपा चैतन्याने तर काँग्रेस सुडाने पेटली आहे. काँग्रेसने चार उमेदवार घोषित केलेत़ औसा या सेनेच्या गडात पाशा पटेलांनी शड्डू ठोकला आहे़ आता युतीच्या उमेदवारीकडे लक्ष आहे़ जिल्ह्यात सहा मतदारसंघ. लातूर शहरातून राज्यमंत्री अमित विलासराव देशमुख दुसऱ्यांदा लढणार आहेत. पिताश्री नसल्याने त्यांची कसोटी आहे. अमित हे विलासरावांसारखे ‘लोक’नेते नाहीत, हा जनआक्षेप तीव्र असून तो पुसण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यासमोर कोण यात सेना-भाजपात कलगीतुरा रंगला आहे. सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ मतदारसंघापैकी लातूर एक असून श्रीपाद उर्फ पप्पू कुलकर्णी हे गेल्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी फेकले गेले. पण पप्पू ‘मेरी झांसी नही दूँगा’ म्हणतात. मुंडे-देशमुख मैत्रीत सेनेला गेलेली ही जागा भाजपाला परत हवी असून काँग्रेसशी काडीमोड केलेले माजी उपनगराध्यक्ष शैलेश लाहोटींनी यासाठी गळ टाकलाय. त्यांनाही निष्ठावंतांचा विरोध आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या अ‍ॅड़ अण्णाराव पाटील यांनी लातूर शहरातून मुख्यमंत्र्यांच्या कराड मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे़ लातूर ग्रामीण हा देशमुखांचा ‘शुगर बेल्ट’ मतदारसंघ. विधानसभा बिगुल वाजेपर्यंत अमित व दिलीपराव हे काका-पुतणे फारसे जवळ नव्हते. मात्र आता काकांनीच अमित आणि धीरज या पुतण्यांना भीम-अर्जुन म्हणत सारथ्य हाती घेतले आहे. आ. वैजनाथ शिंदे यांच्या जागी दिलीपरावांनी लढावे, असा सूर अमित यांनी धरला. मात्र दिलीपरावांनी वैजनाथदादांचाच रेटा लावून धरला होता़ तरीही त्र्यंबकनाना भिसे यांची उमेदवारी घोषित झाली़ गेल्या वेळी थोडक्यात पडलेल्या भाजपा नेते रमेश कराडांची तयारी पाच वर्षांपासून असल्याने यंदा चुरस निर्माण होणार आहे. तर निलंग्यात काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री ‘आजोबा शिवाजीराव’ आणि भाजपाचे आ. ‘नातू संभाजीराव’ असे दोन्हीकडे निलंगेकरच होते़ त्र्याऐंशी वयाच्या शिवाजीरावांऐवजी पुत्र अशोकराव निलंगेकर यांची उमेदवारी घोषित झाली़ आता त्यांच्या पुढ्यात भाजपाकडून भावजय माजी खासदार रूपाताई की पुतणे माजी आमदार संभाजीराव असा प्रश्न आहे़ निलंगेकरांच्या या कौटुंबिक महाभारतात मनसेच्या अभय साळुंकेंनी ‘निलंगेकर हटाव’ चा नारा दिलाय.उदगीरचे भाजपा आमदार सुधाकर भालेरावांचा लोकसभेला खा. सुनील गायकवाडांनी पत्ता कापला. आता विधानसभेला गायकवाडांचे पुतणे विश्वजित स्पर्धेेत आलेत. तिथे राष्ट्रवादीच्या संजय बनसोडेंनीे उदगीर पिंजून काढलेय.